पोहण्यात तरबेज असणाऱ्या तलाठ्याचा, दम लागल्याने पाण्यात बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा महामार्गालगत भोर तालुक्यातील वरवे गावात लघु पाठबंधारेच्या तलावात पोहण्यासाठी गेले असताना तलाठ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. मुकुंद चिरके असे त्या तलाठ्याने नाव आहे. विशेष म्हणजे पोहण्यात तरबेज असताना बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी सात वाजता चिरके हे चार मित्रांसोबत वरवे येथे पोहण्यासाठी गेले होते. पोहताना त्यांना दम लागून ते पाण्यात बुडले. चिरके पोहण्यात सराईत होते. मात्र पोहताना त्यांना दम लागल्याने ते तलावात बुडले. बुडताना मदतीसाठी त्यांनी धावा केला. त्यांच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी आणि स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांना यात यश आले नाही. घटनेची माहिती समजताच तातडीने प्रांतधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील,मंडलअधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पस्तीस वर्षीय मुकुंद त्रिंबकराव चिरके सहा महिन्यापूर्वी वेल्हा तलाठी म्हणून येथे कार्यरत होते. ट्रेकिंग आणि पोहणे हा त्यांचा आवडता छंद होता. सोमवारी ते त्यांच्या तीन मित्रांसोबत पोहत असताना चिरके तलावाच्या मध्यभागी असताना त्यांना दम लागला आणि ते बुडाले. भोरच्या भोईराज जल आपत्ती पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केलं,सहा तासांनी त्यांना मृतदेह शोधण्यात यश आलं. त्यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर मात्र नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

Leave a Comment

error: Content is protected !!