आता कांदा रडवणार नाही…! ; टाटा स्टीलने विकसित केले स्मार्ट सोलुशन, चौकशीसाठी ‘इथे’ करा संपर्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या खरीप हंगामामध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. पण साठवणीतल्या कांद्यामुळे शेतकऱ्याला नफा होताना दिसत आहे. साठवणीतल्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारात चांगला दर मिळतो आहे. सध्या बाजार समित्यांमधला कांद्याचा दर ३०००-४५०० च्या आसपास आहे. त्यामुळे कांदा साठवणूक करणे किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. महाराष्ट्र मध्ये नाशिक, जळगाव,अहमदनगर, धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कांदा हा जास्त काळ टिकणारा नसल्यामुळे त्याची साठवणूक तंत्रशुद्ध पद्धतीने करणे फार गरजेचे असते.

टाटा स्टीलच्यामॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्युशन ब्रँड नेस्ट

भविष्यात जर कांद्याला दरवाढ झाली तर या दरवाढीचा फायदा मिळावा यासाठी बरेच शेतकरी कांदा चाळीत साठवितात. परंतु कांदा साठवणुकीसाठी योग्य यंत्रणा नसल्यामुळे बहुतांशी प्रमाणात कांदा खराब होतो शेतकऱ्यांच्या समस्या वर उपाय शोधत ‘टाटा स्टीलच्यामॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्युशन ब्रांड नेस्ट’ नेदेशातील पहिले कांदा साठवणुकीसाठी एक सोल्युशन ऍग्रो नेस्ट लॉन्च केले आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीत होणार असून यामुळे बऱ्याच प्रमाणात कांदा व्यवस्थित ठेवता येणार आहे.

या तंत्रज्ञानामध्ये विज्ञान, नवीन अद्यावत इनोवेशन चा वापर केला गेला आहे. बर्‍याचदा शेतकर्‍यांनी साठवणूक करण्याच्या पद्धतीत बर्‍याच कमतरता असतात. तसेच साठवणुकीच्या राखण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा 40% कांदाचाळीतखराब होतो. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेता टाटा स्टीलच्या नेस्ट इन आणि इनोव्हेटर टीमने एक स्मार्ट वेअर हाऊस म्हणजे गोदाम सोलुशन ॲग्रोनेस्ट विकसित केले आहे. या तंत्रज्ञानात तापमान, ओलावा आणि गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सर लावण्यात आले आहे. जे सेंसर माल खराब होण्याआधी आपल्याला सूचित करते

नेस्ट-इन ऑफरिंगची मुख्य वैशिष्ट्ये

–आधुनिक बांधकाम उपाय

–त्रास मुक्त अनुभव

–मालाची गुणवत्ता

–हाय स्पीड बांधकाम

–भारतभरातील सर्वात कठीण भूभागांमध्ये सोयीस्कर स्थापना

–सेवेची विश्वसनीयता

चौकशीसाठी संपर्क : [email protected] वर लिहा किंवा 1800 108 8282 वर संपर्क साधा.

 

Leave a Comment

error: Content is protected !!