तापमानात चढ -उतार ; विदर्भात आजही पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या काही भागात सकाळी धुके, दुपारी ढगाळ हवामान पहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 13 रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी 7.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज दिनांक 14 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा ,चंदिगड, मध्ये पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशसह मेरठ येथील देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी दाट धुक्यासह दिवसाच्या तापमानात घट झाल्याने थंड दिवस अनुभवायला मिळाला. उत्तरेकडील हेच थंड वारे महाराष्ट्रमध्ये येत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. तर अनेक ठिकाणी पहाटे दाट धुक्याची चादर पसरली आहे गुरुवार दिनांक 13 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये माळीण येथे 12.6 किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यासाठी तापमानात सतत घट होताना दिसते. पहाटे आणि रात्री थंडी जास्त जाणवते आहे. त्यामुळे पुणेकर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत.

विदर्भात आज पावसाची शक्यता


भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाची शक्यता आहे. आज यवतमाळ वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, आणि गडचिरोली या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागाला यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!