खुशखबर…! पीएम किसान योजनेचा १० वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार ; मिळणार डबल फायदा, जाणून घ्या !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान योनजेत सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या योज़नेचा १० हप्ता सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे. येत्या डिसेम्बर महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १० हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्सनी दिली आहे. दरम्यान मागच्या वर्षीचा विचार करता सरकारने २५ डिसेम्बर रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. यावर्षी सरकार १५ डिसेम्बर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १० वा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे.

मिळणार डबल फायदा

दरम्यान जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल आणि तरीदेखील आधीचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर अजूनही तुम्ही नोंदणी करून हा हप्ता मिळवू शकता. जारी होणाऱ्या पुढील हप्त्यासह तुम्हाला आधीच्या हप्त्याची रक्कम ही मिळेल अर्थात तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होतील मात्र तुम्हाला याकरिता 30 सप्टेंबर पूर्वी योजनेसाठी नोंदणी करावी लागेल.

हे आहेत महत्वाचे संपर्क क्रमांक

<< पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266

<< पीएम किसान हेल्पलाइन नंबर:155261

<< पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401

<< पीएम किसान ची नवी हेल्पलाइन: 011-24300606

<< पीएम किसान ची आणखी एक हेल्पलाइन : 0120-6025109

<< ई-मेल आयडी : [email protected]

या योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही ?

–पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत.
–याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
–खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.
–आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
–केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल..

.

Leave a Comment

error: Content is protected !!