परभणीत पार पडली 30 वी राष्ट्रीय पशु परोपजीवी परिषद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुधनातील कीटक व्यवस्थापनाकरिता हानीकारक रसायनांवर कमीत कमी अवलंबित्वासह पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या दृष्टिने एकात्मिक परजीवी व्यवस्थापनाच्या माध्यमातून, पर्यावरणास अनुकूल विविध मार्गांनी पशुधनाचे उत्पादन वाढविणे हि काळाची गरज असल्याचे मत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल डॉ. आशिष पातुरकर यांनी पशुवैदक व पशु विज्ञान महाविद्यालय परभणी तर्फे आयोजित पशु परोपजीवी शात्राज्ञांच्या ३० व्या राष्ट्रीय परिषदे मध्ये व्यक्त केले.

पशुवैदक व पशुविज्ञान महाविदलयातील पशु परोपजीवीशास्त्र विभागातर्फे १४ ते १६ डिसेंबर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल डॉ. आशिष पातुरकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल , पशू विज्ञान शाखेचे अधिष्ठाता तथा शिक्षण संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा नागपूर विद्यापीठाच्या कार्यकरी परिषद सदस्या श्रीमती मीराताई दादासाहेब टेंगसे , माजी सभापती दादासाहेब टेंगसे, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.नितीन मार्कंडेय ,राष्ट्रीय परोपजीवी परिषेदेच्या अध्यक्षा डॉ. के. देवडा , सचिव ,डॉ. ए . संग्रान आणि राष्टीय परिषेदेचे मुख्य आयोजक डॉ. बाबासाहेब नरळदकर हे व्यसपीठावर उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!