शिक्कामोर्तब ..! 9 ऑगस्टला जमा होणार PM KISAN चा 9 वा हप्ता ,शेतकरी होऊ शकतात सहभागी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या PM KISAN योजनेचा नववा हप्ता काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यापूर्वी काही शेतकऱ्यांना कृषिमंत्री तोमर यांच्याकडून लाभार्थी शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांना येत्या 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या PM KISAN योजनेच्या नवव्या हप्त्याचे वाटप केले जाणार असल्याचे सांगितले होते. आता मात्र या बातमीबाबत शिक्कामोर्तब झाले असून येत्या नऊ तारखेला या योअंजनेचा ९वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. याबाबतचे ट्विट केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केले आहे.

काय आहे ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” अंतर्गत 9 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे बटण दाबून देण्यात येईल. अशा आशयाचे ट्विट तोमर यांनी केले केलं आहे. 9 ऑगस्टला नरेंद्र मोदी 12.30 वाजता दोन हजार रुपये वर्ग करतील, अशी माहिती दिली आहे.

असे व्हा सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या संवादानंतर ते पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील. तुम्ही pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शन द्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

पीएम किसान योजनेत आपले नाव असे पहा

–सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. https://pmkisan.gov.in
–यानंतर तुम्हाला होमपेजवर Farmers Corner पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
–या कोपऱ्यात Beneficiaries List , लाभार्थी यादीचा पर्याय येईल त्यानंतर त्यावर क्लिक करा.
–आता आपल्याला डॅशबोर्डवर क्लिक करावे लागेल आणि राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.
–त्यानंतर Get Report गेट रिपोर्टवर क्लिक करा.
–आता गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल. यामध्ये आपण हे पाहू शकता की योजनेचे पैसे कोणाला मिळवू शकतात

या योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही ?

–पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत.
–याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
–खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.
–आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
–केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल..

Leave a Comment

error: Content is protected !!