म्हशी बी झाल्या थंडगार …! शेतकऱ्याने गोठा थंड ठेवण्यासाठी केली ‘ही’ युक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी उष्णतेत भलतीच वाढ झाली आहे . तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर पोहचला आहे. वाढत्या गर्मी पासून थंडावा मिळवण्यासाठी माणसं अशावेळी कुलर आणि AC चा वापर करत आहेत. पण आपल्या जनावरांना देखील थंडावा मिळावा यासाठी एका शेतकऱ्याने म्हशींच्या गोठ्यात शॉवर लावले आहेत. त्यामुळे वाढत्या गर्मीमध्ये म्हशी बी थंडगार झाल्या आहेत.

प्रवीण काळे नामक शेतकरी महाराष्ट्रातल्या वाशिम येथील उमरा गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या जवळ तेरा दुधाळू म्हशी आहेत. मागच्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमान 42 अंश यांच्या पार गेले आहे. याचा परिणाम प्रवीण काळे यांच्या दुधाळू म्हैशींवर वर होत आहे. वाढत्या तापमानामुळे म्हशीने दूध देणं कमी केले आहे. याचा परिणाम प्रवीण काळे यांच्या दुग्ध व्यवसायावर होत आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी प्रवीण काळे यांना एक युक्ती सुचली. त्यांनी एक मोटर घेतली आणि ती आपल्या गोठ्याच्या छतावर लावली. या मोटर ला पाण्याचं कनेक्शन जोडलं. आणि हा पाईप टाकीमध्ये सोडला. मात्र वाढत्या तापमानाबरोबर त्यांच्या भागात लोडशेडिंगचा सामना देखील त्यांना करावा लागतो आहे. म्हणूनच त्यांनी त्यावर सुद्धा तोडगा काढत सोलर पावर प्लांट चा द्वारे गोठ्यातले शॉवर जोडून घेतले. शेतकऱ्याची ही ट्रीक चांगलीच कमी आली आणि म्हशींना वाढत्या तापमानापासून दिलासा मिळाला. मात्र हा सगळा जुगाड करण्यासाठी त्यांना चार ते पाच हजार रुपयांचा खर्च झाला आहे. पण प्रवीण काळे खुश आहेत कारण त्यांच्या मते आता वाढत्या तापमान पासून सुटका करून घेऊन त्यांच्या म्हशी एकदम कुल कुल झा्ल्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!