टोमॅटोचा गडगडलेला दर वधारला ; अर्धा एकर टोमॅटोतून दररोज 50 हजारांचे उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जोरदार झालेल्या पावसानंतर भाजीपाल्याची बाजारात आवक मंदावली आहे. त्यानंतर आता भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. मागील दोन महिन्यापूर्वी रस्त्यावर टाकून द्यावा लागलेल्या टोमॅटोला आता विक्रमी दर मिळू लागला आहे. माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरी वाडी येथील शेतकरी बाळासाहेब साखळकर यांच्या अर्धा एकर टोमॅटोतून दररोज 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. दर चांगला मिळत असल्याने अर्धा एकर टोमॅटो पासून त्यांना नऊ ते दहा लाख रुपयाचे भरघोस उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

मागील दोन – तीन महिन्यापूर्वी बाजारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. त्यावेळी त्यामुळे बाजारात टोमॅटोचे दर गडगडले होते .अशा वेळी शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली होती.त्यानंतर राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. या पावसात भाजीपाल्याचं व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर आता बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे.

त्यामुळे कोथिंबीर, टोमॅटो,गवार कांदा, वांगी, यासह इतर भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. यातच आता टोमॅटोचा दर प्रति किलो 50 रुपये इतका झाला आहे. टोमॅटोला दर वाढल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.साखळकर यांना त्यांच्या टोमॅटो पिकातून दररोज पन्नास क्रेट इतके उत्पन्न मिळत आहे. बाजारात सरासरी नऊशे ते हजार रुपये एका क्रिकेटची विक्री केली जात आहे. एक आठवड्यापासून त्यांचीही विक्री सुरू आहे. आतापर्यंत साधारण शंभर क्रिकेटची त्यांनी विक्री केली आहे. त्यांना जवळपास साडेतीन लाख रुपये मिळाले आहेत. आणखी सहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!