हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार ‘ऍक्शन मोड’ वर ; सहकार मंत्र्यांकडून महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले असले तरी देखील बाजारामध्ये हरभऱ्याला चांगला भाव मिळत नाहीये. हे भाव पाच हजार रुपयांच्या आतच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहाजिकच नाफेडच्या हमीभाव केंद्रांवर गर्दी केली आहे. शेतकरी आपला हरभरा हमीभाव केंद्राकडे विकण्याचा निर्णय घेताना दिसत आहे. अशातच राज्याचे पणन व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी हमीभाव केंद्रावर हरभऱ्याच्या नोंदणीची तारीख वाढविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंत्रालयात हंगाम 2021- 22 मधील हरभरा खरेदी साठवणूक नियोजन आणि शेतकरी चुकारे संदर्भात आढावा बैठक आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

50.84 लाख क्विंटल हरभरा खरेदी झाला

यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी आतापर्यंत झालेल्या हरभऱ्याची खरेदी, नोंदणी याचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले किमान आधारभूत किमतीने हरभरा खरेदी साठी आतापर्यंत चार लाख 94 हजार 390 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मार्चपासून आजतागायत 50.84 लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून उद्दिष्टपूर्तीसाठी 17 मेपर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. सध्या हरभरा 5230 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येत असून एक मार्चपासून 730 खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज तागायत 4,94,334 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे 50.84 लाख क्विंटल खरेदी करण्यात आलीये. 2 लाख 80 हजार 284 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. खरेदीची एकूण किंमत 2658.93 कोटी असून 1958.40 कोटी निधी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

मंत्री बाळासाहेब पुढे बोलताना म्हणाले चालू वर्षी राज्यामध्ये हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाले तथापि बाजार भाव मात्र हमीभावापेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

–राज्याला दिलेला हरभरा खरेदी चे उद्दिष्ट 6.89 लाख मेट्रिक टन पूर्ण करण्यासाठी सर्व राज्य नाफेड संस्थांनी प्रयत्न करावेत
— अवकाळी पावसामुळं खरेदी केलेल्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात खरेदी केलेला शेतमाल लवकर गोदामात जमा करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे
— हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यात यावेत यासाठी व्यवस्थापकीय संचालक पणन महासंघ मुंबई यांनी नाफेड व भारतीय अन्न महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत.
–शेतकरी अन्न महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत
–शेतकरी चूक कारण बरोबर हमालीचे पैसे अनुषंगिक खर्च बारदान याचे पैसेही नाफेडने लवकर अदा करावे
–राज्यातील चना खरेदी वाढवावी त्याचबरोबर गोडाऊनच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिले आहेत

Leave a Comment

error: Content is protected !!