गारठ्याने पुणे जिल्ह्यात 1 हजार 777 मेंढ्या दगावल्या; मेंढपाळांकडून आर्थिक मदतीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी गारठ्यामुळे 20 मेंढ्या दगावल्याची घटना ताजी असताना आता पुणे जिल्ह्यात देखील मेंढपाळांच्या मेंढ्या गारठयाने दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गारठ्यामुळे पुणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 777 मेंढ्या ह्या दगावल्या आहेत तर 600 मेंढ्या ह्या गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झालेआहे.

मागील दोन तीन दिवसात पुण्यात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला आहे, त्याची झळ झळ ही जुन्नर तालुक्यातील मेंढपाळांना बसलेली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 777 मेंढ्या ह्या गारव्यामुळे दगावल्याची नोंद प्रशासन दरबारी करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक झळ ही जुन्नर तालुक्यातील मेंढपाळांना बसलेली आहे. कारण या एकाच तालुक्यातील 650 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यानंतर आंबेगाव तालुक्यात 366, शिरुर तालुक्यात 341, पुरंदर तालुक्यात 131, खेड तालुक्यात 84, हवेलीत 18, दौंडमध्ये 24 , मावळ तालुक्यात 93, तर बारामती तालुक्यात 70 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पशूसंवर्धन विभागाकडे झाली आहे.एवढेच नाही तर जिल्ह्यात 600 मेंढ्या ह्या वातावरणामुळे गंभीर जखमी आहेत. या 600 पैकी एकट्या जुन्नर तालुक्यात 300 मेंढ्या ह्या जखमी झालेल्या आहेत.

आता मदतीची अपेक्षा

ज्या मेंढ्यावर मेंढपाळ आणि त्यांच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह सुरु होता त्या मेंढ्याचाच मृत्यू एका रात्रीतून झालेला आहे. याची नोंदही पशूसंवर्धन विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता मेंढपाळांना थेठ आर्थिक मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे. या ठिकाणी पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष मदतीची.

संदर्भ : टीव्ही ९

Leave a Comment

error: Content is protected !!