उष्णतेची लाट ओसरली ; राज्यात बहुतांशी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी आजही पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच पश्‍चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर कर्नाटक पर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून राज्यात ढगाळ हवामान होत आहे. यामुळे कोकणासहित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

सध्याचे वातावरण पाहता , राज्यात उन्हाचा चटका कायम आहे मात्र उष्ण लाट ओसरली आहे. त्यामुळे गरमी पासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात सध्या पावसाला पोषक हवामान तयार झाले असून बऱ्याच भागात ढगाळ हवामान होत आहे. आज(१३) राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आज या भागात पावसाची शक्यता
१) सातारा
२)कोल्हापूर
३)सांगली
४)सोलापूर
५)सिंधुदुर्ग

कुठे किती तापमान ?

दिनांक १२ एप्रिल रोजी अकोला उच्चांकी ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यातील इतर भागातील कमाल तापमान पुढीलप्रमाणे पुणे ३९.१, नगर ४१.६, धुळे ४१.८, कोल्हापूर ३४.१, महाबळेश्‍वर ३१.१, मालेगाव ४२.६, नाशिक ३७.८, निफाड ३९, सांगली ३६.७, सातारा ३८.४, सोलापूर ३९.६, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३३.९, रत्नागिरी ३३.२, औरंगाबाद ४०.८, नांदेड ४०.८, परभणी ४१.४, अकोला ४३.७, अमरावती ४२.८, बुलडाणा ३९.८, ब्रह्मपुरी ४२.२, गोंदिया ४१.५, नागपूर ४१.४, वर्धा ४१.६, वाशीम ४२.०, यवतमाळ ४१.२.

Leave a Comment

error: Content is protected !!