राज्यात ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक भाव , जाणून घ्या आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात दररोज १००/१५० रुपयांनी वाढ होत होती. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मागील दोन दिवसात सोयाबीनच्या दराला पुन्हा उतरती कळा लागली आहे. मागील २ दिवसात सोयाबीनचे दर तब्बल ४०० रुपयांनी खाली आले आहेत. सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे हे दर घसरले असल्याचा दावा व्यापारी करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवर होत अललेल्या बदलाचा परिणाम थेट बाजार समितीमधील सोयाबीनच्या दरावर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.

अकोला बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर

राज्यातील महत्वाच्या कृषीउत्पन्न बाजार समितीमधील आजचे (३०-११-२१) दर पाहता अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालेला दिसतो आहे. आज या बाजार समितीत सोयाबीनला किमान ५८००, कमाल६६००,सर्वसाधारण ६३०० इतका दर मिळाला आहे. याचा बाजार समिती मध्ये मागील आठवड्याच्या सुरवातीला ८३०० इतका सर्वाधिक दर मिळाला होता. मात्र आता सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याखालोखाल वाशीम, परतूर,बीड ,नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल भाव ६००० च्या वर मिळाला आहे.

दर घटण्यामागे कारणे

–सोयाबीनचे दर हे वाढत होते तर आवक ही मर्यादितच होती. मात्र, सोमवारपासून चित्र बदलू लागले आहे.
–सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये तब्बल 400 रुपयांनी दर हे घसरलेले आहेत.
— सोयापेंडची घटती मागणी
— कोमोडिटी बाजारात झालेली घसरण
— ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातावर येत असलेली बंधने ही कारणे समोर येत आहेत.

आजचे 30-11-21, सोयाबीन बाजारभाव प्रति क्विंटल ( किमान-कमाल -सर्वसाधारण )

सोलापूर -5200 -6151-5915
अकोला -5800-6606-6300
परतूर 5975- 6220- 6215
वाशिम 5200- 6500- 6004
बीड -4800-6200- 5894
नागपूर 4600- 6391-5943
औरंगाबाद -5882-6000-5941
माजलगाव- 5000-6162-5900
राहुरी व्मभोरी -5400-6200- 5800
सिल्लोड – 5500-6100-5700
उदगीर -6150-6240-6195
कारंजा -5525-6150-5875
तुळजापूर – 6000-6000-6000
मोर्शी -5500-6400-5950
राहता -5700-6200-6000
हिंगोली -5500-6200-5850
लातूर -5960-6480-6205

Leave a Comment

error: Content is protected !!