राज्यात सर्वाधिक 43.6 अंश तापमानाची नोंद ; अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता भारतीय हवामान विभागाने काल दिली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. तर लॉंग पिरेड अवरेज रेन्फॉल हा 99% राहण्याचा अनुमान भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. म्हणजेच देशात पाऊस चांगला होणार आहे. सध्याचे हवामान बघता उष्णता जैसे थे आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसतो आहे.

विदर्भ मराठवाडा या भागात तापमान चाळीशीच्या पार गेले आहे. तर काल राज्यांमध्ये सर्वाधिक तापमान अकोला इथं नोंदवण्यात आले असून हे तापमान 42.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सोलापूरच्या काही भागांमध्ये कालही अवकाळी पावसाने हजेरी लावली सोलापुरात मात्र काढणीला आलेल्या द्राक्षाचा अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून बार्शी तालुक्यातल्या आडगाव पंचक्रोशीत झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका इथल्या शेतकऱ्यांना बसला आहे.

कुठे किती तापमान

दरम्यान काल दिनांक 14 एप्रिल रोजी नोंदविण्यात आलेले राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान पुढील प्रमाणे

पुणे 39.5, लोहगाव 40.2, कोल्हापूर 33.6, महाबळेश्वर 29.4, मालेगाव 42 पॉईंट चार ,नाशिक 38.9, सांगली 36.7, सातारा 37.7, सोलापूर 41 पॉइंट 4, मुंबई 34.36, सांताक्रुज 33.8, रत्नागिरी 32.5, औरंगाबाद 40.1, परभणी 40 अंश सेल्सिअस, अकोला 43 पॉइंट 6, बुलढाणा 40 पॉइंट 6, ब्रह्मपुरी 41.5, चंद्रपूर 43.2, गोंदिया 37 ,नागपूर 39.6, वाशिम 42.5 ,आणि वर्धा 40.5.

Leave a Comment

error: Content is protected !!