पुढचे पाच दिवस पुन्हा पावसाचा लपंडाव; शेतकऱ्यांना पावसाची आशा …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला राज्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर पाऊस जणू काही गायबच झाला… मागच्या चार दिवसात मात्र राज्यातल्या काही ठिकाणी पावसाचे हजेरी लावली. मात्र पुन्हा एकदा पुढचे पाच दिवस पाऊस दडी मारणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  मागच्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे यंदाचे खरिपाचे पीक वाचेल अशी अपेक्षा होती.  मात्र पाऊस पुन्हा हुलकावणी देणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.

कधी परतणार पाऊस ?

राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस पाऊस असेल पण पावसाचे प्रमाण कमी असेल. पाऊस पडले पण हलका ते मध्यम स्वरुपाचा असेल. पाऊस नसण्याची परिस्थिती सर्वसाधारण दहा दिवस असेल, असं भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी सांगितले.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसारपुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाही. इशारे, अंदाज नाहीत म्हणजे मान्सून सक्रिय नाही. पुढील काही दिवस अशीच प्रकारची परिस्थिती राहिल, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं पुन्हा आगमन होईल, असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

आज येथे बरसणार हलक्या सरी

आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!