पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ; ढगांच्या गडगडाटासह गारपीटीची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवला आहे राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा इथे पावसाच्या सरी बरसतात तर साताऱ्यात काही ठिकाणी गारपीट सुद्धा नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता येत्या एक जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसापासून कर्नाटकच्या उत्तर भागात सक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे काही भागात आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढत असल्याने कमी झालेला पारा पुन्हा वाढला. काही भागात ढगाळ वातावरण आहे. मागील 24 तासात विदर्भात अकोला येथे सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने सिंधुदुर्ग आणि सोलापूर सह विविध जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्ग मध्ये शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि विजांच्या लखलखाटात जोरदार पाऊस कोसळला. हवामान विभागाने राज्यात पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देखील दिला आहे.

कुडाळ, कणकवली, वैभववाडी तालुक्याला या पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्याने काही ठिकाणी पडझड झाली आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आजही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं राहण्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे नागरिकांनी त्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात तर्फे करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार आठ मे रोजी सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर नऊ ते 11 मे दरम्यान जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस होऊ शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!