सोयाबीन दरवाढीच्या आशेचा आता एकच किरण ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीन हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मागील काही आठवड्यात सोयाबीनचे भाव 6400 रुपयांवर स्थिर होते. मात्र आता त्यामध्ये घसरण होऊन हे सर सर्वसाधारणपणे 6000 रुपयांवर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा सावध पवित्रा घेत सोयाबीनची साठवणूक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या आवकेवर परिणाम झाला आहे. मात्र दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली तरच आता सोयाबीनच्या दरात वाढ होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. गेल्या आठवडयात रिफाईंड सोयाबीनच्या तेलाच्या दरात वाढ झाली. खाद्यतेलाच्या दरात सुधारणा झाली तरच आता सोयाबीनच्या दारात सुधारणा होण्याची आशा व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आत तोच एकमेव आशेचा किरण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे.

आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील सोयाबीन बाजारभावानुसार मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार 285 इतका कमाल भाव सोयाबीन ला मिळाला आहे. आज मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची केवळ 37 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव 5200 जास्तीत जास्त भाव सात हजार 285 आणि सर्वसाधारण भाव पाच हजार 971 इतका मिळाला आहे. सोयाबीनच्या आवकेचा विचार करता सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 14 हजार 470 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता कमीत कमी भाव 6001 जास्तीत जास्त भाव 6170 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार शंभर रुपये इतका राहिला आहे. त्याखालोखाल अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे देखील आज चांगला भाव मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आज सर्वाधिक भाव हा 6955 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. राज्यातील एकूण सर्वसाधारण सोयाबीनचे बाजार भाव बघता ते पाच हजार ते सहा हजार या दरम्यान आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 27-1-22 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/01/2022
उदगीरक्विंटल6200605061306090
कारंजाक्विंटल3500552560005850
परळी-वैजनाथक्विंटल740582661366001
राहताक्विंटल42607661446100
गंगापूरहायब्रीडक्विंटल19501159255725
सोलापूरलोकलक्विंटल37577559005800
नागपूरलोकलक्विंटल202495060255756
अमळनेरलोकलक्विंटल20580058755875
हिंगोलीलोकलक्विंटल600569962005949
ताडकळसनं. १क्विंटल115585062006000
लातूरपिवळाक्विंटल14477600161706100
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल128600061516100
अकोलापिवळाक्विंटल1777500069556000
यवतमाळपिवळाक्विंटल763395061655057
मालेगावपिवळाक्विंटल37520072855971
चिखलीपिवळाक्विंटल1212570064006050
वाशीमपिवळाक्विंटल2400510059305500
भोकरपिवळाक्विंटल46550459675735
जिंतूरपिवळाक्विंटल215555061516056
परतूरपिवळाक्विंटल64580060506040
गंगाखेडपिवळाक्विंटल35625065006300
तेल्हारापिवळाक्विंटल300565060005800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल300570062116100
निलंगापिवळाक्विंटल228590061116000
उमरगापिवळाक्विंटल35525061005900
पाथरीपिवळाक्विंटल44550058005600
पालमपिवळाक्विंटल18617961796179
उमरखेडपिवळाक्विंटल190560058005700
काटोलपिवळाक्विंटल97360058004560
पुलगावपिवळाक्विंटल145520060815900
घणसावंगीपिवळाक्विंटल190560061005980

Leave a Comment

error: Content is protected !!