उद्यापासून या भागात मुसळधार पाऊसाची शक्यता तर या जिल्ह्यांत मिळणार उघडीप; पहा हवामान खात्याचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला पाऊसाने चांगलेच झोडपले आहे. सोमवारपासून या भागात पाऊसाची उघडीप पाहायला मिळेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच विदर्भात येत्या काही दिवसात गडगडाटीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी वर्तवला आहे. विदर्भातील नागपूर , भंडारा, वर्धा (हिंगणघाट ), गडचिरोली, हांद्रापूर(ब्रह्मपुरी ) आणि यवतमाळ या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात अनेक भागात पाऊस पडत आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी ट्विट करुन वर्तवली आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा (हिंगणघाट), गडचिरोली, हांद्रापूर (ब्रम्हपुरी) आणि यवतमाळ जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी तुरळक गडगडाटीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अशा आशयाचे ट्विट हवामान विभागाने केले आहे.

दरम्यान,, विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या पेरणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी हवामान खात्याचा हा अंदाज महत्वाचा आहे. या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी हे वर्ष अधिक चांगले जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!