ठरलं म्हणजे ठरलं …! सोलापूर विभागात निश्चित झाला द्राक्षांचा दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका केवळ मुख्य पिकांना नाही तर फळबागांनादेखील झाला आहे. त्यातही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष हंगाम सुरु झाला असताना काहीतरी शेतकऱ्याच्या हातात यावे या उद्देशाने द्राक्ष उत्पादक संघाने महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. किमान आधारभूत दारातून दिलासा मिळावा अशी भूमिका संघाने घेतली आहे. द्राक्षाच्या वाणानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. नाशिक सांगली नंतर आता सोलापूर विभागासाठी दर निश्चित करण्यात आले असून यासंदर्भात बैठक पंढरपूर येथे पार पडली. बैठकीत ठरल्याप्रमाणे द्राक्ष आणि बेदाण्याचे दर हे 10 टक्के इतक्या झालेल्या खर्चावर नफा ठेऊन दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून हा निर्णय यशस्वी करून दाखवण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी केले आहे.

बैठकीत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर दर न ठरवता बैठकीत ठरल्याप्रमाणे दर ठेवावा असे आवाहन पवार यांनी केले आहे. दरम्यान सोलापूर द्राक्ष उत्पादक संघामध्ये लातूर,सोलापूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होऊ शकतात. द्राक्षाचे दर हे वाणानुसार ठरविण्यात आले आहेत.

असे द्राक्षाचे असतील दर

१)थॉमसन 35 रुपये किलो
२)माणिक चमन 40 रुपये किलो
३)सुपर सोनका 50रुपये किलो
४)आर.के.एस.एस एन 55 रुपये किलो
५)आनुष्का 55 रुपये किलो

बेदाणा दर

१) चान्गल्या प्रतीच्या बेदाण्यासाठी – 200
२)हलक्या प्रतीच्या बेदाण्यासाठी -100

Leave a Comment

error: Content is protected !!