राघु चोचीच्या राजाचा रुबाबच वेगळा ; तब्बल 31 लाखांला मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो शेतकरी आणि त्याची जनावरे यांचं नातंच काही और असत. शेतकरी आपल्या जनावरांची जीवापाड काळजी घेत असतो. यापैकी काही जनावरं ही लाखात एक असतात. असाच काहीसा आहे राघू चोचीचा राजा नावाचा देखणा बोकड… विशेष म्हणजे या बोकडाची किंमत तब्बल ३१ लाख आहे. कोरोनाची लाट ओसरल्यामुळे पुन्हा एकदा कृषी प्रदर्शने , जनावरांचे बाजार फुलू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही गती मिळत आहे.

होय ! सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील माडग्याळ जातीचा आणि राघू चोचीचा एक बोकड तब्बल ३१ लाखाचा आहे. आटपाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या राजा नावाच्या बोकडाचा सत्कार केला आहे. या बोकडा बरोबर फोटो काढण्यासाठी ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी गर्दी केली होती. माडग्याळ जातीचा बकरी आणि बोकड हे जगप्रसिद्ध आहेत. या बोकडाला बाजारात लाखो रुपयांची किंमत येत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी रागू सारखी चोच असणारा हा बोकड अतिशय देखणा सुंदर दिसतो. त्यामुळे या बोकडाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

तब्बल ३१ लाखाची मागणी

आटपाडी मधील विलास पाटील यांचा माडग्याळ जातीचा राजा नावाचा बोकड आहे, त्याचा संभाळ हा अप्पा खरात यांनी केला. राजा बकरा अवघ्या २ महिने ८ दिवसाचा असून त्याला तब्बल ३१ लाखाची मागणी आहे. याच्या आज्जीला तब्बल दीड कोटीला मागितला असल्याचे मालकाने यावेळी सांगितले. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातून बोकडाला मागणी आहे. दररोज याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी असते.

Leave a Comment

error: Content is protected !!