तुरीच्या दरात तेजी येण्याची शक्यता…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या कापसाला 10 हजारहून अधिक भाव मिळतो आहे. यामागे उत्पादनात झालेली घट हे महत्वाचे कारण आहे. असेच काहीसे तुरीच्या बाबतीत होण्याचा अंदाज तंज्ञानाकडून वर्तवला जात आहे. तुरीच्या दरात तेजीची शक्यता बाजरातील सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या हमीभाव केंद्रांकडून तुरीला प्रति क्विंटल 6300 इतका हमीभाव मिळतो आहे. मात्र बाजारातील भाव काही ठिकाणी हमीभावापेक्षा जास्त मिळत आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा तुरीला फटका

यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फाटका तुरीला बसला आहे. सुरवातीला अतिवृष्टीतून पीक शेतकऱयांनी कसे बसे वाचवले. त्यानंतर पुन्हा अति थंडी आणि ढगाळ वातावरणाचा तुरीला मोठा फटका बसला. ढगाळ वातावरणामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन काही ठिकाणी अक्षरश: तुरीचा खराटा झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे साहजिकच तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. आणि सध्या तूर बाजारात आणायच्या वेळी देखील ऊन पुरेसे नसल्यामुळे तुरीच्या आद्रता आहे.

तसे पाहता देशांतर्गत तुरीखालील सरासरी क्षेत्र 44. 29 लाख हेक्‍टर इतका आहे. त्यामध्ये सर्वाधिक 12. 77 लाख हेक्‍टर क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. त्याखालोखाल कर्नाटक मध्ये 9.93 लाख, मध्यप्रदेश मध्ये 5.3 ,गुजरात 2.2, उत्तर प्रदेश 2.25, झारखंड 2.1 तेलंगणा 2.96 ,आंध्रप्रदेश 2.50, तमिळनाडू 0. 50 हेक्‍टर याप्रमाणे समावेश आहे. 2021-22 या वर्षात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 12. 64 अशा कमी क्षेत्रावर तुरीची लागवड झाली आहे. मात्र दुसरीकडे गुजरात राज्यामध्ये तुरीचे लागवड क्षेत्र वाढल्याचं दिसून येत आहे.

तूर वाळत घालता आलेली नाही व्यापाऱ्यांना देखील ते शक्य होत नसल्याची स्थिती आहे. सध्या स्थितीत अकोला बाजारात तुरीचे व्यवहार 5600- 6315 या प्रमाणात होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अकोला बाजार समितीत तुरीला चांगली तेजी आली होती. सहा हजार नऊशे रुपयांचा दर मिळाला होता. सध्या तुरीमध्ये पंधरा टक्के पेक्षा अधिक आद्रता येत असल्यानं तुरीचे दर कमी असल्याचं सांगितलं जातं. कमी ओलावा असलेली तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली त्यानंतर बाजार देखील तेजीत राहील असं व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, खामगाव, लातूर, सोलापूर या बाजार समित्यांमध्ये तुरीची सर्वात मोठी उलाढाल होते.

Leave a Comment

error: Content is protected !!