(KCC)किसान क्रेडिट कार्डची प्रक्रिया आणखी सोपी, केवायसीबाबत(KYC) मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना राबवल्या पासून देशातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्जाची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्ड घेण्याची बँकेची फी रद्द करण्यात आली आहे. आता किसान क्रेडिट कार्ड काढताना केवायसी जमा करण्याची प्रक्रिया देखील रद्द करण्यात आलेली आहे.केंद्र सरकारन किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी केली आहे. यासाठी लागणारं प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आलं आहे. बँकांना गावांगावामध्ये कँम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी सोप्या पायऱ्या

— किसान क्रेडिट कार्डला अर्ज करण्यासाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर जावा.
–तिथे तुमच्या जमीनीची माहिती, पिकाची माहिती भरा.
–केसीसी फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि बँकेत नेऊन जमा करा.
–पीएम किसान योजनेचा लाभ ज्या बँकेत मिळतो त्या खात्याची माहिती किसान क्रेडिट कार्डचा अर्ज भरताना सादर करावी लागेल.
–या प्रक्रियेत नव्यानं केवायसी प्रक्रिया करावी लागणार नाही.

कोण घेऊ शकते किसान क्रेडिट कार्डचा लाभ ?

–किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते.
–वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते.
–शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.
–शेतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती, जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल, तो केसीसी बनवू शकतो.
–कर्जाची मुदत संपेपर्यंत केसीसीसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे.
–60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे.
–हा अर्जदाराचा जवळचा नातेवाईक असू शकतो. सह-अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे
— आयडी प्रुफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स असावेत. अर्जासाठी अर्जदाराचा पासपोर्ट साईझ फोटोदेखील आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!