शेतकरी उत्पादक कंपन्यांकडूनही होणार तुरीची खरेदी , ‘या’ जिल्ह्यात झाली सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या माध्यमातून तुरीकरिता हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या हमीभाव केंद्रांवर ६३०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. महाराष्ट्रात १ जानेवारीपासून १८६ खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर केंद्राच्या किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील शेतकऱ्यांची तूर खरेदी करता येणार आहे. मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्यक्ष याला सुरवात झाली असून दोन्ही जिल्ह्यातील 27 शेतकरी उत्पादक कंपन्या तूरीची खरेदी करणार असून शेतकऱ्यांच्या नोंदी त्यांच्याकडे झाल्या आहेत.

परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा विचार करता 27 शेतकरी कंपन्याना पहिल्याच टप्प्यात परवानगी देण्यात आली आहे. तूरीची खरेदी ही हमीभाव केंद्राप्रमाणेच केली जाणार असून हमीभाव केंद्राअंतर्गत या कंपन्याचा कारभार सुरु राहणार आहे. याबाबत बोलताना श्री फाळेश्वर महाराज फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे संचालकानी सांगितले की या उपक्रमाला नव्याने सुरुवात झाली आहे. अद्यापही शेतकऱ्यांना याबाबत माहिती नाही त्यामुळे नोंदींचे प्रमाण कमी आहे. मात्र हळूहळू याची जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाव नोंदणी करिता ही कागदपत्रे महत्वाची
१)7/12 उतारा, 8 अ,
२)पिकपेरा
३) बॅंकेचे पासबुकची झेरॅाक्स

Leave a Comment

error: Content is protected !!