पावसाची पुन्हा एकदा विश्रांती ; आज ‘या’ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सुरु असलेल्या पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली आहे. तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. आज दिनांक 3 रोजी कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात मधील नलियापासून उदयपुर,गुणा , गोंदिया, गोपालपुर या परिसरावरून पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात पर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 5.8 किलो मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून हरियाणा पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात तयार कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले दोन तीन दिवस राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती. ही प्रणाली विरून जाताच पावसाने पुन्हा उघडीप दिली. आज दिनांक 3 रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी तर उर्वरित राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

विदर्भात वीज, पावसाचा अंदाज

पश्‍चिम विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला वाशीम यवतमाळ जिल्ह्यात आज दिनांक 3 रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

४ सप्टेंबर पासून परत राज्यात पावसाचे पुनरागमन

बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाच्या क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे येत्या ४-६ सप्टेंबर दरम्यान परत एकदा जोरदार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे.एकंदर संपूर्ण राज्यात याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिल्याची माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!