लाल यादीमध्ये सोलापुरातल्या 13 साखर कारखान्यांचा समावेश , पहा लिस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जे साखर कारखाने एफ आर पी ची रक्कम पूर्णपणे आदा करीत नाहीत त्यांना त्यानुसार राज्यातल्या कारखान्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत राज्यातील किती साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे पैसे दिले याची यादी साखर आयुक्तांनी जाहीर केली असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखाने अपूर्ण एफआरपी देणाऱ्या कारखान्यांच्या लाल यादीमध्ये आले आहेत.

साखर कारखान्यांना अशी दिली जाते ओळख
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतची माहितीही थेट साखरकर विभागाच्या संकेतस्थळावर ही ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध केली आहे. कायद्यानुसार 100% एफआरपी आदा करणाऱ्या कारखान्यांना परिशिष्टात हिरव्या रंगाची ओळख दिली आहे. तर शंभर टक्केच्या आत एफआरपी दिलेले कारखान्यात पिवळ्या रंगाने दर्शवण्यात आले आहे. तर 80 टक्‍क्‍यांपर्यंत एफआरपी दिलेले नारंगी रंगानं, तसेच 60 टक्‍क्‍यांपर्यंत केलेले कारखाने लाल रंगाने दर्शवण्यात आले आहेत.

कुठे पहाल यादी ?
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ही माहिती http://suger.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील लाल यादीत ‘या’ करखान्यांचा समावेश
–लोकनेते बाबुराव पाटील कारखाना अनगर,
–औदुंबर रावजी पाटील आष्टी
— युटोपियन शुगर मंगळवेढा
–सिद्धनाथ शुगर तिर्‍हे
–सिद्धेश्वर कारखाना कुमठे
–भैरवनाथ शुगर लवंगी
–जयहिंद शुगर आचेगाव
–ओमकार चांदापुरी,
–भैरवनाथ शुगर आलेगाव
— संत दामाजी मंगळवेढा
–इंद्रेश्वर शुगर बार्शी
— भैरवनाथ शुगर विहाळ
–जकराया शुगर मोहोळ

Leave a Comment

error: Content is protected !!