रब्बीवरील संकटाची मालिका संपुष्टात, शिवारात बहरतोय हरभरा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाच्या अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बीची पेरणी केली मात्र अवकाळी पावसाने रब्बी पिकांना धोका निर्मण झाला. काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र आता रब्बी पिकांना हवे असे पोषक हवामान बनले आहे. त्यामुळे ज्वारी , गहू हरभरा पिके शिवारात चांगली बहरू लागली आहेत.

रोगराईचा प्रादुर्भाव झाला कमी
वातावरणातील बदलामुळे पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावा लागली होती. पण आता वातावरण कोरडे झाले असून गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी सुरु झाली आहे. त्यामुळे घाटीअळी, मर रोगाचा प्रादुर्भाव हा कमी झाला असून केवळ हरभराच नाही तर सर्वच पिकांची वाढ जोमाने होऊ लागली आहे.

असे करा व्यवस्थापन
–पाण्याची उपलब्धता असल्याने रब्बी पिकाकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळले आहेत.
— त्यातच सर्वाधिक पेरा हा हरभरा पिकाचा झालाय.
–सध्या काही भागात हरभरा पिकांवर मर रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काची फवारणी करावी,
–त्यानंतर गरज पडल्यास कीड प्रतिबंधात्मक फवारणी करावी जेणेकरून हरभरा पीकाचे चांगले उत्पादन येईल असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी एका टीव्ही माध्यमाशी बोलताना केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!