मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील मंत्रालयासमोर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे.  त्या शेतकऱ्याची मृत्यूशी सुरू असलेली  झुंज अखेर संपली आहे.  20 ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  त्यांच्यावर मुंबईतील जी टी रुग्णालयात उपचार सुरू होते.  डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण उपचारादरम्यान अखेर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सुभाष जाधव वय वर्ष 48 असं या शेतकऱ्याचं नाव आहे.  या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जमिनीच्या व्यवहारात सुभाष जाधव यांची फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात ही धाव घेतली होती. पण तिथे त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते काही दिवसापासून अस्वस्थ होते. शुक्रवारी सकाळी (दि २०) ते मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. त्यांनी गार्डन गेट प्रवेशद्वारातून मंत्रालयात येण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी गेटजवळच कीटकनाशक प्राशन केले. त्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांच्या नजरेस ही बाब आल्यावर त्यांना पोलिसांनी तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!