साखरेच्या दराने ओलांडला 3500 चा टप्पा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक बाजारात साखरेचे वाढलेले दर चढेच राहत आहेत. साखर दराने आता 3500 रुपयांचा टप्पा पार केला असून अनेक साखर कारखान्यांची साखर 3600 रुपयांपर्यंत विकली जात आहे. येत्या दोन महिन्यात सणासुदीचे दिवस असल्याने साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भविष्यात साखरेची चणचण लक्षात घेता वायदेबाजार फ्युचर मार्केट तेजीत असल्याने याचा परिणाम साहजिकच स्थानिक बाजारात झाला आहे. येत्या काही महिन्यात साखर वाढीव दराने मिळेल या अपेक्षेने व्यापारी सध्या वेगाने साखर खरेदी करत आहेत याचा सकारात्मक परिणाम दर वाढण्यावर झाला आहे.

अनेक जागतिक संस्थांनी ब्राझील सह अन्य देशात साखरेचे उत्पादन भविष्यात कमी होण्याचा अंदाज वर्तवला नंतर जागतिक बाजारात अनपेक्षित तेजी आली याचा फायदा स्थानिक बाजारालाही होऊन दरवाढ सुरू झाली किमान विक्री मूल्य 3100 रुपयांच्या दराच्या वर पहिल्यांदाच साखरेला मागणी आली. एक दोन दिवसात दर वाढत वाढत जाऊन आता काही साखर कारखान्यांनी 3600 रुपयांपर्यंत साखर विक्री आहे. पंधरा वर्षात तब्बल 500 रुपयांनी दर वाढल्याने याचा मोठा फायदा कारखान्यांना येणाऱ्या हंगामातील एफ आर पी ची रक्कम देताना होणार आहे.

इंटरनॅशनल सुगर ऑर्गनायझेशन च्या ताज्या अंदाजानुसार यंदा ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 35 ते 40 लाख टन कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात जागतिक बाजारात 30 ते 35 लाख टन साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. गेल्या आठ दिवसांमध्ये जागतिक बाजारातील क्रूड ऑईलचे दर वाढले आहेत. या बरोबरच इथेनॉलला मिळणारा चांगले दर यामुळे उर्वरित हंगामात ब्राझीलमध्ये इथेनॉल जादा उत्पादन होण्याची शक्यता असल्यामुळे साखरेच्या उत्पादनात आणखी घट होईल असा अंदाज आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळे अफगाणिस्तानला साखर निर्यात होण्याची शक्यता कमी असली तरी अन्य देशाकडून भारतीय साखरेला मागणी येण्याची दाट शक्यता आहे. जवळील देशाकडून यंदा भारतीय साखरेला मागणी राहील असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी स्थानिक विक्रीबरोबरच साखरेची मागणी नोंदवणार या देशांकडे प्राधान्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त साखर देशाबाहेर पाठवावी असे आवाहन साखर उद्योगातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!