हुर्रर्र…चल सर्जा राजा… ! पोलीस आधिक्षकांनाही आवरला नाही बैलगाडा हाकण्याचा मोह ; व्हिडीओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तब्बल सात वर्षानंतर बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये मोठा उत्साह आहे. राज्यातल्या अनेक भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले गेले. सिंधुदुर्गातील वैभववाडी येथे देखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी बंदोबस्तावर असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना देखील बैलगाडा हाकण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी देखील बैलगाडीवर स्वार होत हातात कासरा धरला आणि बैलगाडी पळवली यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हयरल होतो आहे.

याबाबत बोलताना बगाटे यांनी सांगितले की, ते मूळ हिंगोली येथील शेतकरी कुटुंबातील आहेत , लहानपणी त्यांनी अशा शैर्यती पाहिल्याचे सांगत बैलगाडा हाकण्याचा मोह आवरता आला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान बंदी उठवल्यानंतर ही कोकणातील पहिलीच बैलगाडा शर्यत होती. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता. तसेच अनेक बैलगाडा प्रेमींनीही याठिकाणी गर्दी केली होती. हे शर्यत शासनाच्या नियमावलीनुसार पार पडली.

दरम्यान या स्पर्धेचे आयोजन श्री बंड्या मांजरेकर मित्रमंडळ नाधवडे यांच्याद्वारे करण्यात आले होते. यात २७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या शिर्यातीत देवरुख येथील शिवा शंकरची बैलजोडी प्रथम आली.बैलजोडीने 800 मीटरच अंतर अवघ्या एक मिनिटं 19 सेकंदात पार करून विजेते होण्याचा मान पटकाविला. शिवा शंकर बैलजोडीचे मालक समीर बने यांनी शिवा शंकर प्रथम येणार याबद्दल खात्री होती व त्यासाठी शिवा शंकरला तयार केल्याचे बने यांनी सांगितले.शिवा शंकर जोडीने या स्पर्धेत उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

Leave a Comment

error: Content is protected !!