शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ सरकारमुळेच , कृषिपंप वीजकापणीवरून राज्य विधिमंडळात उठला आवाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे उन्हाळयात पाण्याविना शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. याच प्रश्नावरून शेतकरी संघटनांनी राज्यभरात आंदोलन सुरु केलं असून अद्यापपर्यंत सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. आता याचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटू लागले आहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावरून ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय सुरज जाधवच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कृषी पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

सरकारला झालंय काय?
यावेळी बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणले , राज्य सरकारच्या धोरणामुळेच सुरज जाधव सारख्या तरुण शेतकऱ्यावर ही वेळ येत आहे. सरकारकडून शेतकरी हीताच्या गोष्टी अपेक्षित आहेत. मात्र, ठाकरे सरकारला नेमके झाले तरी काय? गेल्या दोन वर्षात अस्मानी संकट आणि यंदा सुल्तानी संकट यामुळे जणूकाही सरकारच हे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे चित्र सध्या राज्यात सुरु आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली पीके ही करपून जात आहेत. रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण असताना सरकारच अडचणी निर्माण करीत आहे. ठाकरे सरकारला नेमके झाले तरी काय असा सवाल यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला होता.

या सरकारला झालय काय ?
गतवर्षीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाही कृषीपंपाची वीज कापली जाणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, ठाकरे सरकामध्ये ताळमेळ नाही . उपमुख्यमंत्र्यांचं ऊर्जामंत्री ऐकत नाहीत. आता उर्जामंत्री हे विद्युत पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे ठणकावून सांगत आहे. सरकारच्या या धोरणांचाच फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत.

अनेक सूरज जाधव सरकार तयार करतंय …
राज्यातला शेतकरी फेसबुक लाईव्ह करून शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लागत आहे. एक सूरज जाधव पहायला मिळतोय अनेक सुरज जाधव सरकार तयार करतयं.. त्यामुळे विनंती आहे की किमान सुरज जाधवची का होईना कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.

काय आहे सूरज जाधव प्रकरण ?
शेतकऱ्याच्या जन्माला आपण परत कधीच येणार नाही … आपल आयुष्य इथ पर्यंतच होत. इथून पुढे आयुष्य नाही .. शेतकरी नामर्द आहे. त्यामुळे शेतकर्यच्या जन्माला आपण येणार नाही .. सरकार कधी शेतकर्याच्या नादाला लागत नाही…. सरकार शेतकर्याच्या कधी विचार करत नाही अस म्हणत पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या तरुण शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.विष प्राशन करतानाचा स्वतःचा व्हिडिओ त्याने व्हायरल केला आहे. या तरुणाचा उपचारा दरम्यान पंढरपूरच्या सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!