हरभरा लागवडीसाठी हे आहेत सुधारित वाण, देतील भरघोस उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून आता शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. रब्बीतील प्रमुख पिकांपैकी एक असणारे पीक म्हणजे हरभरा आजच्या लेखात आपण हरभऱ्याच्या काही सुधारित वाणांची माहिती घेऊया… ही माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत देण्यात आली आहे.

१ ) विजय– या वाणाचा कालावधी १०५ ते ११० दिवस असून उत्पादन जिरायत : १४-१५ बागायत : ३५-४० उशिरा पेर : १६-१८ इतके येते
याचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक उत्पादनक्षम, मररोग प्रतिकाराक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य अवर्षण प्रतिकारक्षम,महाराष्ट्र मध्यप्रदेश, गुजरात राज्यांकरिता प्रसारित

२) विशाल- या वाणाचा कालावधी ११०-११५ दिवस आहे. उत्पादन जिरायत : १४-१५ बागायत : ३०-३५ असून याचे वैशीष्ट्य आकर्षक पिवळे टपोरे दाणे, आधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित असे हे वाण आहे.

३) दिग्विजय- याचा कालावधी १०५-११० असून उत्पादन जिरायत : १४-१५ बागायत : ३५-४० उशिरा पेर : २०-२२ आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित

४) विराट– या वाणाचा कालावधी ११०-११५ दिवस आहे. याचे उत्पादन जिरायत : १०-१२ बागायत : ३०-३२ असून याची वैशिष्ट्य म्हणजे काकली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित

५ )कृपा – या वाणाचा कालावधी १०५-११० दिवसांचा असुन सरासरी उत्पन्न बागायत : १६-१८ जिरायत : ३०-३२ इतके आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे जास्त टपोरे दाणे असलेला काबुली वाण, दाणे सफेद पांढ-या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांकरिता प्रसारित (१०० दाण्यांचे वजन ५९.४ ग्रॅम)

६ )साकी ९५१६-या वाणाचा कालावधी १०५-११० दिवसाचा असून सरासरी उत्पन्न १८-२० इतके आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण मररोग प्रतिकारक्षम, बागायत क्षेत्रासाठी योग्य

७ )पीकेव्ही -२- या वाणाचा कालावधी १००-१०५असून सरासरी उत्पन्न १२-१५ इतके असून या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मररोग प्रतिकारक्षम

८) पीकेव्ही ४-या वाणाचा कालावधी १०० -११० दिवस असून सरासरी उत्पन्न १२-१५ इतके आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मररोग प्रतिकारक्षम

९ )जाका ९२१८– हे वाण अधिक टपोरे दाणे, लवकर परिपक्व होणारे आहे.

१० )एकेजी ४६– या वाणाचा कालावधी १००-१०५ दिवसांचा असून याचे वैशिष्ट्य म्हणजे टपोरे दाणे, मर रोगप्रतिबंधक रोपावस्थेत लवकर वाढणारा

११) खेता– हे वाण जिरायत ८५-०० बागायत – १००-१०५ सरासरी उत्पन्न देते , या वाणाचे दाणे टपोरे असतात.

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!