‘ही’ आहेत पिकांसाठी व फळबागेसाठी प्रमुख विद्राव्य खते ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेच त्या घटकांच्या संबंधित विद्राव्य खताची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणी द्वारे दिल्यास जास्त फायदा होतो.

पिक व फळबागांसाठी उपयुक्त विद्राव्य खते

1-19:19:19,20:20:20
या विद्राव्य खताना स्टार्टर ग्रेड म्हणतात. या खतांमध्ये नत्र अमाइड,अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेतशाकीय वाढीसाठी होतो.

2-12:61:0
या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यात अमोनिकल स्वरुपातील नत्र कमी असतो. यात पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे अधिक प्रमाण असते. नवीन मुळाच्या तसेच जोमदार शाखीय वाढ, मुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खतांचा उपयोग होतो.

3-0:52:38
या खतास मोनोपोटॅसियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर असतात. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेसाठी तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.

4-13:0:45
या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोरा नंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अण्णा निर्मिती वत्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.

5-13:40:13
कपाशीला पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताचे फवारणी केल्यास फुलगळ थांबून कपाशीची बोंडे वाहने पिकात शेंगांची संख्या वाढते.

6- कॅल्शियम नायट्रेट
मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात ठोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेतया खताचा वापर होतो.

7-24:28:0
यामधील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे. शाखीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेत त्याचा वापर करतायेतो.

संदर्भ : कृषी जागरण

Leave a Comment

error: Content is protected !!