‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार PM Kissan योजनेचा फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । पीएम किसान सम्मान निधीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचे मेसेज आले आहेत मात्र अनेकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तर काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्याची काय कारणे आहेत. ते आपण जाणून घेवूया. PM Kisan Sanman Nidhi

जर तुमच्या नावावर शेतजमीन नसेल तर तुम्ही पीएम किसान सम्मान निधि योजना चा फायदा घेऊ शकत नाही. यासाठी तुमच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. जर एखादा शेतकरी शेती करतो, परंतु संबंधित जमीन त्याच्या नावावर नाही तर संबंधित व्यक्ती लाभार्थी यादी मध्ये बसू शकत नाही. जर शेती त्यांच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावे आहे, तर संबंधित व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. जर एखादा व्यक्ती शेत जमिनीचा मालक आहे, परंतु तो सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त झाला आहे किंवा पूर्व खासदार, आमदार, मंत्री राहिला असेल तर त्यांना पीएम किसान योजनेचा फायदा मिळत नाही. याशिवाय प्रोफेशनल रजिस्टर डॉक्टर, इंजिनीयर, वकील, चार्टर्ड अकाउंटट शिवाय या संबंधित लोकांच्या परिवारातील लोकांना या योजनेचा फायदा मिळत नाही. PM Kisan Sanman Nidhi

जर एखादा व्यक्ती शेतीचा मालक असेल, परंतु त्याला जर १० हजार रुपयांपर्यंत सरकारी पेन्शन असेल तर अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नाही. जे व्यक्ती आयकर रिटर्न भरतात. अशा व्यक्तींना या योजनेचा फायदा मिळत नाही. जमिनीमध्ये पती, पत्नी किंवा नाबालिक मुले यांच्या जवळ संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या भूमीविषयक रेकॉर्डमध्ये एकत्रित दोन हेक्‍टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असेल ते व्यक्ती छोटे किंवा अल्पभूधारक या व्याख्येत येतात. याबरोबरच जमिनीचा वापर शेती कामाशिवाय दुसऱ्या कामासाठी केलेले शेतकरी याचा लाभ घेवू शकत नाहीत. गावातील बरेच शेतकरी दुसऱ्या शेतामध्ये शेतीचे काम करतात असे व्यक्ती शेतीचे मालक नसतात. परंतु संबंधित शेताच्या मालकाला धान्य किंवा हिश्यापोटी काही पैसे देतात. असे शेतकरी योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत.

Leave a Comment

error: Content is protected !!