अशा पद्धतीने 2 दिवसात घराच्या घरी तयार करा रामबाण जैविक कीट नियंत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढताना पहायला मिळतो. थंडीच्या दिवसात विशेषतः विविध आळ्यांचा प्रादुर्भाव पिकांवर होतो. अशावेळी शेतकरी रासायनिक फवारणी करतात मात्र आज आपण जैविक पद्धतीने कीड नियंत्रण कशी करता येईल याची माहिती घेऊया… (हा जैविक उपाय शेतकऱ्यांनी घाटेआळी , उंट आळी , पाने खाणारी आळी यांच्याकरिता सुरवातीच्या अवस्थेत किंवा कीड होऊच नये याकरिताही वापरू शकता ) हे जैविक किट नियंत्रक केवळ २ दिवसात आपल्याच शेतात/घरी तयार करता येणारे अत्यंत प्रभावी रामबाण कीट नियंत्रक आहे.

कृती:
एका मोठ्या तांब्याच्या हंड्यात १० ते १५ लिटर देशी गायीचे गोमूत्र घ्या.त्यात खालील वनस्पतींचे पाले ठेचून टाका
★कडुलिंब पाला अर्धा किलो
★रुई(रुचकी/रुटी) पाला २५० ग्राम
★सीताफळ पाला २५० ग्राम
★धोतरा पाला २५० ग्राम
★बेशरम पाला २५० ग्राम

खालील वस्तु कुटून टाकाव्यात :-
★लसूण २५० ग्राम
★हिरवी मिरची २५० ग्राम
★गावरान तंबाखू २५० ग्राम
गोमूत्रातील वरील मिश्रणावर झाकण ठेवून उकळण्यास ठेवावे. उकळून अर्धे झाल्यावर ४८ तास थंड करावे. त्यानंतर गाळून घेऊन प्लास्टिक पात्रात भरून ठेवावे.

फवारणी:
कोणत्याही पिकावर दर आठवड्याला एका पंपाला ५० ते ७५ मिली टाकून फवारणी करावी. कोणतेही रोग येणार नाहीत. मात्र रोग येण्याची वाट पाहत न बसता दर आठवड्याला फवारणी करत जावी. हरभरा, कांदा, गहू, सोयाबीन, ऊस, तूर, कपाशी, तसेच फळ पीके इत्यादी पिकावर वापर करता तसेच पिकांची अवस्था बघून फवारणी केलेली योग्य राहील किड पडल्यावर फवारणी केल्या पेक्षा पिकांचे निरीक्षण करून फवारणी करणे योग्य राहील.

लेखक – जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
9404075628

 

Leave a Comment

error: Content is protected !!