PM Kisan : पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर झाला ‘हा’ मोठा बदल; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील एक मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे आणि याच्या मदतीने उदरनिर्वाह करत आहे. या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारही आपल्या स्तरावर अनेक प्रयत्न करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) ही देखील अशीच योजना आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. दर 4 महिन्यांच्या अंतराने 2-2 हजार रुपये करून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते.

पीएम किसानच्या १२व्या हप्त्याची प्रतिक्षा

आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत. ताज्या अपडेटनुसार, सप्टेंबर महिन्याच्या कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची रक्कम (PM Kisan) पाठवली जाऊ शकते.

पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर मोठा बदल

सध्या पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर एक मोठा बदल दिसत आहे. ई-केवायसी आयोजित करण्याच्या तारखेबाबत वेबसाइटवर दिले जाणारे अपडेट पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२२ असा संदेश वेबसाईटवर येत होता. आता मात्र आता असा संदेश दिसत आहे की, ” पीएम किसान चा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ई -केवाय सी करणे अनिवार्य असून पीएम किसनच्या पोर्टलवर ओटीपी च्या माध्यमातून तसेच जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने इकेवायसी करता येईल ” असा संदेश दिसत आहे. असा अंदाजही वर्तवला जात आहे की हा 12वा हप्ता लवकर रिलीज होण्याचे संकेत देखील असू शकतो.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घट

पीएम किसान सन्मान निधीचा (PM Kisan) लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी सातत्याने सुरू आहे. या दरम्यान अनेक लाभार्थी अपात्र असल्याचे समोर येत आहे. अशा अपात्रांना सतत नोटिसा पाठवून चुकीच्या पद्धतीने मिळालेल्या सर्व हप्त्यांची वसुली केली जात आहे. यावेळी या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी घट होणार असल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!