‘ही’ वनस्पती चोपण जमिनीच्या सुधारणेसाठी फायदेशीर , जाणून घ्या कसे सुधाराल चोपण जमिनीचे आरोग्य ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. आजच्या लेखात आपण चोपण जमिनीत (Alkaline Soil) सुधारणा करण्यासाठी कोणते उपाय करता येतील याची माहिती घेऊया…

चोपण जमिनी ओलसर असताना इतक्या चिकट असतात की, काही वेळेस पेरलेलेही उगवत नाही. सामू नियंत्रित ठेवण्यासाठी काही शेतकरी जमिनीत अॅसिड(Acid) टाकतात. परंतु अॅसिड टाकल्याने जमिनीतील सुक्ष्मजीवाणु मृत्यु पावतात. काही शेतकरी बाहेरून तांबडी माती (Red Soil) विकत आणून ती चोपण जमिनीत टाकतात, त्यामुळे खर्चात अतिरिक्त वाढ होते.

चोपण जमीन कशाला म्हणतात ?
–या जमिनीत विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण शेकडा १५ पेक्षा जास्त असते.
–विद्राव्य क्षारांची विद्युतवाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते.
— सामू ८.५ ते १० पर्यंत असतो.
–जमिनीतून पाण्याचा समाधानकारक निचरा होत नाही.
— पाण्याची मात्रा दिल्यानंतर ही जमीन चिकट होते.
–तर वाळल्यावर हीच जमीन टणक होते.
— जमिनीत हवा खेळती राहत नाही त्यामुळे या जमिनीत पिकांची वाढ योग्य होत नाही.

चोपण जमिनीची आरोग्य सुधारणा

–चोपण जमिनीला १ टक्के उतार द्यावा. योग्य अंतरावर चर काढावेत.
–जमिनीखाली सच्छिद्र पाईप टाकून पाण्याचा भूमिगत निचरा करावा.
–जमिनीत सच्छिद्र पाईप टाकल्यानंतर त्यातून पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी जमिनीचा उतार योग्य ठेवावा.
— माती परीक्षण करून जिप्सम ८ ते १० टन प्रति हेक्टरी शेणखतामध्ये मिक्स करून जमिनीत टाकावे.
–चोपण जमिनीत कोणतेही पिक घेत असताना सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा.
–पिकांची फेरपालट करत असताना धैंचा जमिनीत गाडावा.
–माती परीक्षणानुसार खत नियोजन करावे.
–नत्राची मात्रा देत असताना २५ टक्के जास्त द्यावी.
–या जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने, ऊस, कापूस यांसारखी पिके घेऊ शकतो.
–युरियाचा वापर करणे टाळावे.
–त्याऐवजी अमोनियम सल्फेट तसेच सिंगल सुपर फोस्फेट या आम्लयुक्त खताचा वापर करावा.
–कमतरतेनुसार सुक्ष्मअन्नद्रव्यांचा विशेषतः जस्त आणि लोहाची मात्रा शेणखतामधून द्यावी.
–पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचनाद्वारे(Drip irrigation) करावे.
–पाण्यात विद्राव्य रासायनिक खते देखील ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यावीत.
–यामुळे ४० ते ५० टक्के पाण्याची आणि खतांची बचत होते.

चुका नावाची वनस्पती जमिनीच्या सुधारणेसाठी फायदेशीर
रासायनिक खते देताना निंबोळीसोबत द्यावीत. चुका नावाची वनस्पती आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळून येते. चुक्याच्या पानांचा सामू हा ४ पर्यंत असतो. पावसाळा सुरु होण्यापूर्वी चोपण जमिनीत चुक्याच्या बिया आणून टाकाव्यात. चुक्याच्या वनस्पतीला पाने आल्यानंतर ती नांगरणी करून जमिनीत गाडावीत. असे प्रयोग लागोपाठ तीन वर्षे केल्यास जमिनीत सुधारणा दिसून येतात.

Leave a Comment

error: Content is protected !!