यंदा खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा तब्बल 80 टक्‍क्‍यांनी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्य तेलाच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सोयाबीन शेंगदाणे, सूर्यफूल, जवस तेलाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्क्यांनी वाढले आहेत नवीन पीक येण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी असल्याने पुढील चार महिने भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘या’ कारणामुळे भाववाढ

पाम तेलाचे भाव इतर तेलांच्या तुलनेत कमीच असतात मलेशिया मधून आयात होणाऱ्या या तेलावर पूर्वी आयात शुल्क 15 टक्के होता त्यात थेट दुप्पट वाढ होऊन 30 टक्के झाले आहे. त्यामुळे पाम तेलाचे भाव वाढले. गेल्यावर्षी खाद्यतेलाचे भाव 95 ते 100 रुपये प्रतिकिलो असलेले सोयाबीन तेल सध्या 175 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय गेल्या वर्षी शेंगदाणा तेल 120 रुपये प्रति किलो मिळत होते. आता 190/ 195 वर जाऊन पोहोचले आहेत. 130 रुपये प्रति किलो असलेले सूर्यफूल तेल 180 ते 185 रुपयांना विकत घ्यावं लागत आहे.

कोरोना मुळे वाढलेल्या आरोग्यावरील खर्च, इंधनाचे वाढते दर आवाक्याबाहेर जाणारे आहे. गॅस सिलेंडरचे दर यामुळे जगावं तरी नेमकं कसं हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडत आहे. गेल्या वर्षीपासून एक तर कोरोना मुळे व्यवहार ठप्प राहिल्यामुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटली आहे. विदेशातून 70 टक्के खाद्यतेलाची आयात होते यंदा अमेरिकेमध्ये आणि मलेशियामध्ये पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे खाद्य तेलाच्या भावात सतत वाढ होते अवकाळी पावसामुळे सोयाबिनचे नुकसान होत आहे

Leave a Comment

error: Content is protected !!