यंदा मान्सून सरासरी 98 टक्के ; ‘या’ कंपन्यातील गुंतवणुकीवर मोठ्या कमाईची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी एक जूनला केरळ मध्ये मान्सून हजेरी लावणार असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होईल तर दहा जून पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एवढेच नाही तर यंदाच्या वर्षी सरासरी 98 टक्के पाऊस पडेल असा अंदाजही आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाला तर त्याचा अर्थव्यवस्थेवर ही चांगला परिणाम दिसून येतो. मान्सून येण्याला इतकं महत्त्व का बरं प्राप्त झालेले असतं? कारण आपल्या कृषिप्रधान भारत देशाचे आर्थिक गणित शेतीवर आणि परिणामी पावसावर अवलंबून असते. पाऊस चांगला झाल्यास शेती चांगली पिकते कंपन्यांच्या उत्पादनासाठी कच्चामाल उपलब्ध होतो परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते. तसेच शेतीशी निगडित असणाऱ्या कंपन्यांचे उत्पन्न देखील वाढते.

एका अहवालानुसार खरीप हंगामात मान्सून पावसावर भारतातील 20 कोटी शेतकरी शेती करतात यामध्ये धानाची पेरणी, ऊस लागण, मका, कापूस आणि सोयाबीन यासारख्या पिकांचा समावेश असतो. मात्र देशातील एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी केवळ 50 टक्‍क्‍यांच्या आसपास सिंचनाची सोय झाली असल्याने शेतीच्या उत्पन्नावर त्याचा फार फरक पडतो. कृषी क्षेत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा 14 टक्‍क्‍यांवर गेला आहे.

या कंपन्यांमध्ये गुंतवणुक

रॅलीस इंडिया

रॅलीस इंडिया ही टाटा ग्रूपची कृषी क्षेत्रातील केमिकल कंपनी आहे. तज्ञांच्या मते पुढील तीन ते सहा महिन्यात रॅलीस इंडिया कंपनीच्या उत्पादनांच्या विक्री मध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. मान्सूनचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यास ग्रामीण भागातून मागणी वाढते जीसीएल सिक्योरिजनं रॅलिस इंडियाचे शेअर 370 रुपयांना खरेदी करावेत असा सल्ला दिला आहे.

कोरोमंडल इंटरनॅशनल

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज हाऊस ने कीटकनाशक बनवणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास सध्याच्या मूल्य 728 रुपये आणि त्यावर 41 टक्के परतावा मिळू शकतो

एस्कॉर्ट लिमिटेड

खरीप हंगामात शेती करण्यासाठी ट्रॅक्‍टर आणि इतर अवजारांची मागणी वाढते त्याचा फायदा एस्कॉर्ट्स लिमिटेड या कंपनीला होऊ शकतो केडिया कमोडिटी चे संचालक विजय केडिया यांनी या कंपनीत १२80 बेस ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!