हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

(kharif 2022) : कृषी विभागाची पूर्व तयारी समाधानकारक, यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या २७ तारखेपर्यंत मान्सून(Monsoon) केरळात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. लवकरच तो महाराष्ट्रातही येण्याचा अन्दाज आहे. तत्पूर्वी राज्यातील बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावतो आहे. आगामी खारीप हंगामासाठी राज्याचा कृषी विभागात तयार झाला आहे. शिवाय राज्यातील शेतकरी देखील आगामी खरिपाच्या(kharif 2022) तयारीला लागले आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप(kharif 2022) हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने सतर्क रहावे. तसेच कृषी विभागाची पूर्व तयारी समाधानकारक असल्याने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या बैठाकीला उपमुख्यमंत्री अजित पवार ,महसुल मंत्री .बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री.बाळासाहेब पाटील , कृषी मंत्री दादा भुसे यांची उपस्थिती होती.

अतिरिक्त उसासाठी प्रति टन २०० रुपयांचे अनुदान

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील अतिरिक्त ऊस प्रश्नी महत्वाची बैठक पार पडली. या दरम्यान शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक १ मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती .यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार असून राज्यात १ मे २०२२ नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे ५२ लाख टन गाळप अपेक्षित आहे. यापैकी आजअखेर ३२ लाख टन गाळप झाले आहे. तसेच १ मे २०२२ नंतर गाळप होणाऱ्या व ५० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या साखर आयुक्तांनी अनिवार्य ऊस आदेश काढलेल्या ऊसास प्रतीटन पाच रुपये प्रती किलोमीटर वाहतूक अनुदान देण्यात येईल, असेही सहकार मंत्री पत्रकार परिषदेत माहिती दिली.

error: Content is protected !!