राज्यातील ‘या’ भागात पुढील ३,४ तासात गडगडाटसह पाऊस लावणार हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. येत्या काही दिवसात तो तळकोकणातही दाखल होईल आणि त्यानंतर राज्यातल्या इतर भागातही हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्याक्त केला आहे. मात्र राज्यातील अनेक भागात काल मान्सूनचा परिणाम दिसून आला. राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आजही राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या ३ ,४ तासात गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात दक्षीण रायगड, पुणे (वेल्हे , पुणे शिरूर बारामती इंदापूर ) सातारा अहमदनगर ,औरंगाबाद ,जालना ,परभणी, बीड, हिंगोली या भागांचा समावेश असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे. दरम्यान मागील दोन दिवसात संध्याकाळनंतर जोरदार पावसाचे आगमन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच दिवसभर देखील ढगाळ वातावरण आहे.

मान्सूनचे केरळात आगमन, कर्नाटकाच्या सीमेवर …

गुत्र्यवारी मान्सूनने केरळमध्ये एंट्री केली आहे. आज नैऋत्य मान्सून केरळचा उर्वरित भाग व्यापून टाकेल असे भारतीय हवं खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच कर्नाटक किनारपट्टी ,दक्षिण उत्तर कर्नाटक , आंध्रप्रदेशचा काही भाग तसेच तामिळनाडूच्या सीमेवर मान्सून असेल. तर पुढील दोन तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!