कपाशीवरील ‘या’ रोगांचे वेळीच व्यवस्थापन करा, नाहीतर होईल नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असावी लागते. उष्ण दिवस आणि थंड रात्र याप्रकारचे हवामान बोंडे चांगली भरण्यास व उमलण्यास उपयुक्त असते. आजच्या लेखात कपाशीवरील प्रमुख रोग आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी माहिती घेऊया. सदरील माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

कपाशीवरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन

१)बुरशीजन्य करपा (अल्टरनेरिया ब्लाइट) : हा रोग पेरणीपासून ७०-७५ दिवसात दिसतो. यामुळे पानावर व बोंडावर गोलाकार विटकरी किंवा काळ्या रंगाचे ठिपके येतात. यावरील उपाय म्हणजे प्रॉपिकोन्याझोल (५०० मिली) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (१५०० ग्रॅ.) + स्ट्रेप्टोसायक्लीन (६० ग्रॅ.) ५०० लि. पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

२)जीवाणूजन्य करपा (बॅक्टेरिअल लीफ ब्लाइट):हा रोग पेरणीपासून ७५-८० दिवसात दिसतो. यामुळे पानावर गडद विटकरी रंगाचे कोनात्मक ठिपके दिसतात. याकरिता प्रॉपिकोन्याझोल (५०० मिली) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (१५०० ग्रॅ.) + स्ट्रेप्टोसायक्लीन (६० ग्रॅ.) ५०० लि. पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

३)मर व मुळकूज (बिल्ट व रुट रॉट): हा रोग पिकाच्या उगवणीपासून दिसायला सुरुवात होते. यात झाड वाळून जाते मुळे सडतात/कुजतात. याकरिता तीन ग्रॅम प्रति किलोप्रमाणे थायरम किंवा ४ ग्रॅंम प्रति किलो प्रमाणे ट्रायकोडरमाची बीज प्रक्रिया करावी, रोग प्रतिकारक वाण वापरावे.

Leave a Comment

error: Content is protected !!