हरभरा पिकाला चांगले फुटवे येण्यासाठी, अशी करा पिकाची पहिली फवारणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात हरभरा या पिकाची पेरणी झाली आहे. काही तिकडी हरभऱ्याची पिके उगवून आलेली आहेत. सध्याची हवामानाची परिस्थिती बघता ढगाळ हवामान आहे तर काही ठिकाणी पाऊसही पडतो आहे. अशा परिस्थितीत हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकाच्या आत्ताच्या स्थितीला फवारणीची आवश्यकता असते.

हरभरा पिकावर सध्याच्या स्थितीत मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशावेळी कीटकनाशकासह बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचे असते. इमामेक्टीन बेंझोनाईट या कीटकनाशकाचे पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ग्रॅम चे प्रमाण घ्यावे. याबरोबरच रोको या बुरशीनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता. पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्राम रोको हे वापरायचा आहे. तसेच त्याच्या सोबत आपल्या हरभरा पिकाची चांगली वाढ होण्यासाठी चांगल्या फुटवे येण्यासाठी महाधन 19: 19: 19 हे विद्राव्य खत तुम्ही वापरू शकता. तसेच बायोविटा एक्स किंवा सागरिका या टॉनिकचा देखील वापर तुम्ही करू शकता. यामुळे प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया वाढण्यास मदत होते आणि एकूणच पिकाच्या वाढीस हे उत्तम आहे. हे वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी 30 ml या प्रमाणात वापरावे.

Emamectin Benzonite(10gm)+ रोको (30gm)+सगरिका (30ml ) 15 लिटर पंपासाठी याप्रमाणे फवरणी घ्यावी.

फवारणी केव्हा घ्यावी

पहिली फवारणी ही वीस ते पंचवीस दिवसांमध्ये घ्यावी. ज्या शेतकऱ्यांचे कोरडवाहू हरभरा पीक आहेत अशा शेतकऱ्यांनी 19 :19:19 या विद्राव्य खताचा वापर आवश्य करावा.

Leave a Comment

error: Content is protected !!