पर्यावरण व जीवसृष्टी वाचवण्यासाठी गोदाकाठी बांबू लागवडीची चळवळ रुजवा -पाशा पटेल .

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे परभणी

जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली असून मागील दीडशे वर्षांमध्ये दीड टक्का एवढी जागतीक तापमानवाढ नोंदवली गेली असल्याने भविष्यात वेगाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षलागवड करावी लागणार असून मराठवाड्यातील मांजरा नदीकिनारी बांबू लागवडीची मोहीम मी हाती घेतली असून आता गोदावरी काठावर बांबू लागवड ही चळवळ म्हणुन रुजायला पाहिजे अशी अपेक्षा राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी बोलताना व्यक्त केली .

महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व .आ.पाशा पटेल हे २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ .३० वा. परभणी जिल्हातील पाथरी येथे भाजपाचे डॉ राजेंद्र चौधरी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी प्रदेश संघटनमंत्री भाजपा युवा मोर्चा राहुल लोणीकर ,भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कदम , भाजपा वैद्यकिय आघाडी प्रदेश सदस्य डॉ . राजेंद्र चौधरी ,भाजपा किसान सभा जिल्हाध्यक्ष उद्धव नाईक ,भाजपा पाथरी विधानसभा प्रभारी सुभाष आंबट ,भाजपा शहर अध्यक्ष संतोष जोगदंड ,भाजपा युवा शहराध्यक्ष अमोल बोराटे यांच्यासह आदी भाजपा पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती .

पाशा पटेल हे मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथे २५० एकर क्षेत्रावर करण्यात येणाऱ्या बांबू लागवड कार्यक्रम उद्घाटनासाठी आले असता पाथरी येथे आले होते .यावेळी पुढे बोलतांना पाशा पटेल म्हणाले कि, २०१५ साली पॅरिस येथे २०० देशांची प्रतिनिधीनी एकत्र येत पृथ्वीच्या वाढत्या तापमानाला कारणीभूत असणारे व सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करण्यारे पेट्रोल ,डिझल ,कोळसा वापर बंद करण्याचे सांगितले आहे .अशा परिस्थितीत ३०% वनक्षेत्र वाढवावे लागणार असुन सोबतच पर्यायी इंधन उपलब्ध करावे लागेल .

बांबू लागवड फायद्याची

यासाठी बांबू हा सर्वोत्तम पर्याय आहे .यावेळी बांबू लागवडीचे फायदे सांगताना ते म्हणाले की, बांबू व दगडी कोळशाचा उष्मांक ( कॅलीरीफीक व्हॅल्यु ) ४ हजार एवढी समान असुन एकीकडे दगडी कोळसा जाळल्याने ३०% कार्बन उत्सर्जन होते तर बांबूमुळे ३% एवढेच कार्बन उत्सर्जीत होते. त्यामुळे दगडी कोळशालाही बांबू उत्तम पर्याय असून यामुळे बांबूपासून पर्यावरणपुरक वीज निर्मिती होणार आहे .गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारे वीज निर्मिती कारखाना सुरू झाला आहे . याशिवाय सध्या शेतात उत्पादीत होणारा एक टन ऊस गाळपकेल्यावर ८० टन इथेनॉलची निर्मिती होते. तर बहुवार्षिक उत्पादन घेता येणाऱ्या एक टन बांबूपासून ४०० टन इथेनॉल इंधन म्हणून मिळणार आहे. भारतात नुमालीगड येथे नेदरलँड , फिनलॅन्ड आणि भारत या देशांनी एकत्र येत ३ हजार कोटी गुंतवणूक करत जगातील बांबूपासून इथेनॉल निर्मिती करणारी रिफायनरी ऑगष्ट २०२२ मध्ये तयार होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

बांबू अर्थकारण बदलणारं

बांबू पासून कपडा , दीर्घकाळ टिकणारे फर्निचर , ब्रश , फरशी ,स्लॅप , पोओपी , तांदुळ , लोणंच व मीठाची निर्माण होत असल्याचे यातून मोठ्या प्रमाणात अर्थकारण ही बदलणारं आहे .यामुळे देशभर बांबू लागवड वाढीसाठी प्रयत्न चालू आहेत . मराठवाड्यामध्ये मांजरा व गोदावरी नदीच्या २२५० किमी काठावर बांबू लागवड करण्याची आता गरज आहे .लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा नदीकाठी मी ही मोहीम म्हणून हाती घेतली असेल गोदावरी काठीही चळवळ म्हणून रुजावी अशी अपेक्षा असल्याचे यावेळी पाशा पटेल म्हणाले .यासाठी स्थानिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!