आज सोयाबीनला मिळाला 7600चा कमाल भाव ; जाणून घ्या आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीनला कमीत कमी 6100 ते जास्तीत जास्त 7600 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. अकोला बाजार समितीमध्ये आज (७) सोयाबीनला किमान 5600,कमाल 7615,तर सर्वसाधारण 6600 रुपये इतका भाव मिळाला. शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीनची साठवणूक केली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनला 10,000 चा भाव मिळावा अशी अपेक्षा आहे.

यंदा सोयाबीनचा हंगाम हा लांबत आहे. दरवर्षी दिवाळी नंतर आवक वाढते आणि डिसेंबर अखेरपर्यंत आवक कायम राहिल्याने सोयाबीनचा हंगाम संपुष्टात येत असतो. यंदा मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा साठवणूकीवरच अधिक भर दिला होता. सध्याही दरात कमी-अधिकपणा झाला तरी साठवणूक याच भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. सध्याचा दर हा सरासरी असला तरी अनेकांना 7 हजारापेक्षा अधिकची अपेक्षा आहे. त्यामुळे ज्या दिवसांमध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवासाला 50 ते 60 हजार पोत्यांची आवक असते त्या बाजारसमितीमध्ये 10 हजार पोत्यांपेक्षा अधिकची आवकच झालेली नाही.

आजचे सोयाबीन बाजारभाव ७-१२-२१ (किमान -कमाल -सर्वसाधारण)

जळगाव —6100 6700 6550
औरंगाबाद —6200 6600 6400
माजलगाव —5000 6491 6251
उदगीर —6500 6600 6550
कारंजा —5850 6400 6175
परळी-वैजनाथ—6000 6600 6351
सेलु —5800 6630 6526
तुळजापूर — 6450 6450 6450
राहता — 6350 6600 6475
सोलापूर —5000 6450 6280
हिंगोली —5850 6550 6200
मेहकर —5400 6745 6500
लातूर —5800 7011 6600
लातूर -मुरुड—6300 6500 6450
जालना —5200 6800 6300
अकोला —5600 7615 6600
चिखली —5900 6700 6300
वाशीम —5500 6550 6000
पैठण पिवळा—4851 6501 6011
वर्धा पिवळा—6150 6355 6200
भोकर —5877 6519 6200
जिंतूर —5100 6650 6270
सावनेर —4875 6395 6150
जामखेड —6000 6100 6050
शेवगाव —6000 6500 6500
गेवराई —5400 6300 6100
परतूर —6000 6600 6550
गंगाखेड —6800 7000 6800
देउळगाव राजा—5000 6550 6350
नांदगाव —6451 6621 6521
तासगाव —6400 6500 6450
किल्ले धारुर—5960 6499 6391
मुरुम पिवळा—4400 6651 5525
उमरगा —6000 6400 6351
पांढरकवडा—6100 6550 6470
उमरखेड —5100 5300 5200
काटोल —4000 6250 5800
आष्टी- कारंजा—3750 6710 5500
पुलगाव —4500 6505 6350

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!