Tomato Market Price : टोमॅटोचे दर सुधारण्याची शक्यता; पहा आजचे टोमॅटो बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो बाजारभावानुसार आज टोमॅटोला (Tomato Market Price) सर्वाधिक कमाल दर दोन हजार रुपये मिळाला आहे.

हा दर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. आज औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 55 क्विंटल टोमॅटोची (Tomato Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव 1400 कमाल भाव 2000 आणि सर्वसाधारण भाव 1700 रुपये राहिला.तर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान 1500 रुपये कमाल भाव 2000 आणि सर्वसाधारण भाव 1700 रुपये राहिला. तर सर्वाधिक आवक ही कराड कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून हे आवक 800 क्विंटल इतकी आहे.

टोमॅटोचे दर सुधारण्याची शक्यता

पावसामुळं टोमॅटो पिकाचं नुकसान होतंय. त्यामुळं बाजारातील टोमॅटो आवक (Tomato Market Price) कमी झाली. पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या घाऊक दरात मोठी वाढ झालेली नाही. मात्र टोमॅटोच्या किरकोळ दरात किलोमागं ५ ते १० रुपयांची सुधारणा झालीये. राज्यात टोमॅटोचे किरकोळ विक्री दर किलोमागं ४० रुपयांपर्यंत आहेत. तर उत्तरेतील राज्यांमध्ये हाच दर ५० ते ६० रुपये आहे. असं असलं तरी शेतकऱ्यांना केवळ १० ते १८ रुपये दर मिळतोय. पुढील काळात टोमॅटोची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं दर काहीसे सुधारतील, असं जाणकारांनी सांगितलं.

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/08/2022
कोल्हापूरक्विंटल32050015001000
औरंगाबादक्विंटल55140020001700
श्रीरामपूरक्विंटल25100015001250
मंगळवेढाक्विंटल9240019001500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल18122515001395
रामटेकहायब्रीडक्विंटल528001000900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल130120016001400
पुणे- खडकीलोकलक्विंटल21100012001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8100012001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल27980012001000
नागपूरलोकलक्विंटल800100012001150
कामठीलोकलक्विंटल3100016001400
सोलापूरवैशालीक्विंटल1512001600700
जळगाववैशालीक्विंटल50150020001700
नागपूरवैशालीक्विंटल800120015001350
कराडवैशालीक्विंटल6980012001200
भुसावळवैशालीक्विंटल31100010001000

Leave a Comment

error: Content is protected !!