Tomato Market Price : टोमॅटोचे दर उतरले ! प्रतिकिलो 80 वरून थेट 30 रुपयांवर; पहा आजचा टोमॅटो बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या टोमॅटोचा दर हा प्रति किलो 80 रुपयांवरून 30 रुपयांवर (Tomato Market Price) आला आहे. यामुळे महिला आणि गृहिणींना जरी दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसतो आहे. मे जून महिन्यात शंभर ते 80 रुपये किलो ने टोमॅटो घ्यावे लागत होते तोच टोमॅटो आता 20 व 30 रुपये किलोने मिळत आहे.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार टोमॅटोला (Tomato Market Price) सर्वाधिक तीन हजार शंभर रुपयांचा दर प्रती क्विंटल साठी मिळालाय. हा दर मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 65 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. याकरिता किमान भाव 400, कमाल भाव 3100 आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये इतका मिळाला आहे त्याखालोखाल पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2500 रुपयांचा कमाल भाव मिळाला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती इथं टोमॅटोला कमाल दोन हजार रुपयांचा दर मिळाला. तर श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 2200 रुपयांचा दर मिळाला आहे.

तर सर्वाधिक आवक ही पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली असून ही अवघ 2555 क्विंटल इतकी झाली आहे तर याकरिता किमान भाऊ 600 रुपये कमाल भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव (Tomato Market Price) एक हजार पन्नास रुपये इतका मिळाला आहे.

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/07/2022
औरंगाबादक्विंटल93120019001550
श्रीरामपूरक्विंटल27100022001600
पिंपळगाव बसवंतक्विंटल2840021251700
साताराक्विंटल49100020001500
मंगळवेढाक्विंटल6540031002200
कल्याणहायब्रीडक्विंटल3160020001800
पुणेलोकलक्विंटल255560015001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल9100020001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2120012001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल417100015001250
नागपूरलोकलक्विंटल900150020001875
पारशिवनीलोकलक्विंटल6230025002400
कामठीलोकलक्विंटल12100016001400
पनवेलनं. १क्विंटल684160018001700
सोलापूरवैशालीक्विंटल6353001300600
जळगाववैशालीक्विंटल736001200900
नागपूरवैशालीक्विंटल500150017001650

Leave a Comment

error: Content is protected !!