मुंबई-नाशिक महामार्गावर टोमॅटोचा ट्रक पलटी ; तब्बल 20 टन टोमॅटोची नासाडी, पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : टोमॅटोचा ट्रक घेऊन जाणाऱ्या वाहनाला मोठा अपघात घडला. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक दुभाजकाला जाऊन धडकला आणि उलटाला. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावर शुक्रवारी पहाटे झालाय. या अपघातामुळे ट्रक मधील तब्बल 20 टन टोमॅटो रस्त्यावर पडले त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या भीषण अपघातामुळे सर्वत्र टोमॅटो होता सडा पडला होता तर वाहतूक तब्बल पाच तास खोळंबली होती.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. टोमॅटो नि भरलेला हा ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्यानं ट्रक मधील 20 टन टोमॅटो महामार्गावरच पडले होते त्यामुळे महामार्गावर टोमॅटोचा खच खच पडला होता आणि सर्व रस्ता हा लालबुंद दिसत होता.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक आणि टोमॅटो बाजूला करण्यात आले. सकाळी आठच्या सुमारास महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. हा ट्रक के. व्ही. गिरी यांच्या मालकीचा आहे. रात्री ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकाला जाऊन धडकली त्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपघातग्रस्त ट्रक मधील टोमॅटो महामार्गावर पडले. टोमॅटो जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले. मात्र या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटोची नासाडी झाली आहे त्यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!