शेतकरी मित्रांनो इकडे लक्ष द्या ! पीकविमा काढण्याची उद्याची अंतिम मुदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: अनियमित पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. राज्यातील सर्वच विभागांमध्ये अद्याप पर्यंत पेरणी पूर्ण झालेली नाही. पाच जुलैपर्यंत अवघे 65 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. मोठे क्षेत्र लागवडीखाली यायचे आहे. यातच या हंगामासाठी लागू केलेल्या पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागाचे मुदत गुरुवारी तारीख 15 रोजी संपणार आहे. सोमवार पर्यंत 13 लाख 14 हेक्‍टर क्षेत्राचा विमा काढून झाला होता. राज्यातील मोठे क्षेत्र अद्याप पिक विमाच्या कक्षेत आलेले नाही. त्यामुळे ही मुदत वाढवण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

यंदाच्या हंगामात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी दिली. त्यानंतर मात्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सलग स्वरूपाचा पाऊस अद्याप झालेला नाही याचा फटका खरिपाच्या लागवडीवर झाला. पाऊस झालेलया भागातील पेरणी होऊन पिके वाढीला लागली आहेत. या पट्ट्यात कमी पाऊस आला तिथं अद्यापही नापेर क्षेत्र राहिलेले आहेत किंवा सध्या तरी पेरणी सुरू आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात सरासरीच्या 65 टक्के क्षेत्रावर लागवड झाली गेल्या आठ दिवसात पाऊस पडल्याने आता पेरणी सुरू झाली आहे.

मागील आठवड्यापर्यंत सरासरी एक कोटी 42 लाख हेक्टर पैकी जवळपास 92 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. अद्यापही पंचवीस ते तीस लाख हेक्‍टरवर पेरणी होणं बाकी असल्याची शक्यता आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता पीक विमा काढण्यापासून मोठ्या संख्येने शेतकरी वंचित राहू शकतात गेल्या दोन हंगामात पीक विम्याचा मोबदला अपेक्षेनुसार न भेटल्याने अधिक शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आलेला आहे.असे अधिकारी सांगतात तर सोबतच पिक विमा काढताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी ची मोठी समस्या भेडसावते आहे. कागदपत्रांची पूर्तता करताना ही शेतकऱ्यांची दमछाक होते आहे या सर्व बाबींचा विचार करता पिक भीमाला मुदतवाढीची गरज शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

दरम्यान खरीप पिक विमा काढण्याबाबत 15 जुलैपर्यंत ची मुदत केंद्र सरकारनेच दिली आहे. त्यामुळे या मुदतीतच आपल्याला पीक विमा काढावा लागेल असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!