कोकणात मुसळधार ; आणखी तीन, चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबई, ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण विभागात धुवाधार पाऊस सुरू असून, तो विक्रमाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्य़ात देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कमी दाबाचा पट्टा आणखी तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने मुंबई, ठाण्यासह कोकणात आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये या कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारीही (१९ जुलै) मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आदी जिल्ह्य़ांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळला. कोकणात नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून, मुंबई-ठाण्यातील जोरदार पावसाने जनजीवनावर परिणाम झाला आहे. मध्य महाराष्ट्रात नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत हंगामात प्रथमच मुसळधार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मध्य महाराष्ट्रात जोरदार

कोल्हापूर, नाशिक, पुणे, जिल्ह्यातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोल्हापुरातील गगनबावडा येथे 179 मिलिमीटर पाऊस झाला. नाशिक मधील हरसूल येथे 126.2 पेठ मध्ये 183 सुरगाणा 117.1 पुण्यातील लोणावळा 167. 1 मिलीमीटर पाऊस पडला. नगर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात व खानदेशात देखील ढगाळ वातावरण आहे.

मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे उशिरा पेरणी केलेल्या पिकांना आधार मिळाला विदर्भात देखील अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडलाय.

Leave a Comment

error: Content is protected !!