शेतकऱ्याचा शेतकरीच मित्र …! ‘ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे ‘ राबवतोय अनोखा उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांची व्यथा फक्त एक शेतकरीच जाणतो …! असं म्हणतात ते काही खोटं नाही याच वाक्याचा प्रत्यय अकोल्यात आला आहे. अकोल्यातल्या चिखली तालुक्यातील भरोसा इथल्या शेतकऱ्याने खरोखरच शेतीचा भरोसा शेतकऱ्यांना दिला आहे. यंदा पाऊस उशिरा सुरु झाला. जून महिन्यात पावसाने दडी मारली मात्र त्याचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामावर झाला आहे. बेभरवशी पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

नक्की काय आहे उपक्रम ?

म्हणूनच भरोसा येथील शेतकऱ्याने एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे. ‘ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे ‘ असे या उपक्रमाचे नाव आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्यांना दुबार पेरणी करायची आहे त्यांना ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकून नांगरणी करता येणार आहे. हा उपक्रम राबवत असलेल्या या शेतकऱ्याचे नाव आहे श्रीकृष्ण थुट्टे. त्यांनी हा उपक्रम राबवत शेतकऱ्यांच्या वरचा आर्थिक भार कमी केला आहे.

दुबार पेरणी करायची म्हटल्यास त्यासाठी पुन्हा बियाण्यांचा खर्च, पुन्हा एकदा परिश्रम आणि ट्रॅक्टर असा एकरासाठी 8000 रुपयांचा खर्च येतो मात्र शेतकऱ्यांची हीच अडचण आणि त्यांच्यावर ओढवलेली परिस्थिती लक्षात घेता थुट्टे यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

पीक कर्जाच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित

खरीप हंगामाच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या पीक कर्जाच्या लाभापासून अनेक शेतकरी सध्याही वंचित राहिलेले आहेत त्यामुळे उसनवारी आणि साठवणूक केलेल्या धान्याची विक्री करून खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत असं असताना पुन्हा दुबार साठी भांडवल कसं उभं करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे अशा गरजू शेतकऱ्यांना या उपक्रमाची मदत व्हावी म्हणून श्रीकृष्ण थुट्टे यांनी हा अनोखा उपक्रम राबवला आहे ज्याची सध्या चिखली तालुक्यात सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे

Leave a Comment

error: Content is protected !!