Tur Market Price : मागणी वाढल्यामुळे तुरीचे दर तेजीत; आज मिळाला कमाल 8600 रुपयांचा भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो सध्या प्रक्रिया उद्योजकांची तुरीसाठी मागणी वाढती आहे. नव्या तुरीची आवक होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी अजून बाकी आहे. त्यामुळे बाजारात तुरीला (Tur Market Price) चांगला दर मिळत आहे. सध्या तूर बाजारात बाजारात चांगलं वातावरण असून शेतकऱ्यांना तुरीसाठी चांगला भाव मिळताना दिसतोय आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज तुरीला कमाल दर आठ हजार सहाशे रुपये इतका मिळालाय.

हा दर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 1316 क्विंटल लाल तुरीची (Tur Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 7000, कमाल भाव आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण भाव 7560 रुपये इतका मिळाला आहे. तर त्या खालोखाल कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव आठ हजार एकशे पंचवीस रुपये इतका मिळाला आहे. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ हजार शंभर रुपये, तर दिग्रज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव आठ हजार रुपये आज तुरीला मिळाला आहे.

तुरीच्या आवक बद्दल सांगायचे झाले तर आज सर्वाधिक आवक ही मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली असून ही आवक 2690 क्विंटल इतकी आहे. तर यासाठी किमान भाव 7400 कमाल भाव 7800 आणि सर्वसाधारण भाव सात हजार सहाशे रुपये इतका मिळाला आहे.

तुरीचे दर चांगले मिळत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तूर (Tur Market Price) साठवून ठेवली आहे त्या शेतकऱ्यांना आता फायदा होताना दिसत आहे. नवीन तूर येण्यासाठी अजून बराच कालावधी आहे त्यामुळे सध्या ज्या शेतकऱ्यांनी तूर साठवून ठेवली आहे त्यांच्यासाठी हा चांगला काळ आहे असं मानलं जात आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/08/2022
भोकरक्विंटल6450072255862
कारंजाक्विंटल700710081257700
मंगळवेढाक्विंटल7730073007300
मोर्शीक्विंटल2690740078007600
मुरुमगज्जरक्विंटल48777779007839
अकोलालालक्विंटल1353520078007200
अमरावतीलालक्विंटल2166775079617855
यवतमाळलालक्विंटल348700077707385
मालेगावलालक्विंटल7466066006000
हिंगणघाटलालक्विंटल1316700086007560
चाळीसगावलालक्विंटल3425170515000
मलकापूरलालक्विंटल445700081007780
दिग्रसलालक्विंटल72700080007785
सावनेरलालक्विंटल81750578907600
गंगाखेडलालक्विंटल3680070006900
मेहकरलालक्विंटल150700077657400
वरोरालालक्विंटल3650070006700
चाकूरलालक्विंटल3550180017701
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल35700077007350
नेर परसोपंतलालक्विंटल43735074407400
सिंदी(सेलू)लालक्विंटल187635077257550
दुधणीलालक्विंटल179795082058080
वर्धालोकलक्विंटल61745080117650
देउळगाव राजालोकलक्विंटल4570069006900
माजलगावपांढराक्विंटल112700077907600
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल3600060006000
गेवराईपांढराक्विंटल7680075007400

Leave a Comment

error: Content is protected !!